Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

स्थानिक गुन्हे शाखा व बल्लारपूर पोलिसांची संयुक्त कारवाई, एका सराईत आंतरराज्यीय घरफोड्याला अटक, ६ घरफोडी व ३ मोटार सायकलचे गुन्हेसह ४,६५,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त (Joint operation by the Local Crime Branch and Ballarpur Police: Habitual interstate burglar arrested; property worth ₹4,65,000 seized, along with the recovery of items related to six burglary cases and three motorcycle theft cases.)

स्थानिक गुन्हे शाखा व बल्लारपूर पोलिसांची संयुक्त कारवाई, एका सराईत आंतरराज्यीय घरफोड्याला अटक, ६ घरफोडी व ३ मोटार सायकलचे गुन्हेसह ४,६५,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त (Joint operation by the Local Crime Branch and Ballarpur Police: Habitual interstate burglar arrested; property worth ₹4,65,000 seized, along with the recovery of items related to six burglary cases and three motorcycle theft cases.)

चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची कारवाई घरफोडी करणारा सराईत आंतरराज्यीय गुन्हेगारास जेरबंद करून चंद्रपुर जिल्हयातील ६ घरफोडी व ३ मोटार सायकलचे गुन्हे उघड करण्यात आले. पोलीस ठाणे अपराध कमांक आणि कलम फिर्यादीचे नाव व पत्ता बल्लारपूर जि. चंद्रपूर. गुन्हा राजी.कं. ६०६/२०२६ श्रीमती. रजिता परमेश्वर f 1/2 ३९ वर्षे रा. गौरक्षण वार्ड बल्लारपुर जि. चंद्रपुर. गुन्हा घटना ता. वेळ दिनांक १९/०५/२०२६ चे १३/३० ते १६/०० वा. दर गुन्हा दाखल ता. वेळ माहिती कशी प्राप्त झाली. दि.१९/०५/२०२६ चे २३/००० वा. सि.सि.टी.व्ही. फुटेज व तांत्रीकातून कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार मा. श्री. आयुष नोपानी साो, पोलीस अधिक्षक, चंद्रपुर. मा. श्री. ईश्वर कातकडे साो., अपर पोलीस अधिक्षक, चंद्रपुर. यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल काचोरे, प्रभारी स्था.गु.शा. चंद्रपूर. पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे ठाणेदार पो.स्टे. बल्लारपूर सहा. पोलीस निरीक्षक दिपक कांकेडवार, स्था.गु.शा. चंद्रपुर. सहा. पोलीस निरीक्षक बलराम झाडोकार, स्था.गु.शा. (सायबर सेल) चंद्रपुर. पोलीस उपनिरीक्षक, विक्की लोखंडे, पोलीस ठाणे बल्लारपुर. सफौ/स्वामीदास चालेकर, पो.हवा./किशोर वैरागडे, पोहवा./अजय बागेसर, पोहवा/शरद कुडे, पोअं./गोपीनाथ नरोटे, पोअं/शेखर माथनकर, चापोअं/वृषभ बारसिंगे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर तसेच पोहवा / विकास जुमनाके, पोअं./ वैभव गाडगे पोलीस ठाणे बल्लारपुर जि. चंद्रपुर. आरोपीची पुर्व इतिहास आरोपी नामे चिन्नाबाबु व्यंकटेशवरलु गोरेला, रा. राजमुंद्ररी (राजमहेद्रंवरम) राज्य आंधप्रदेश यांचेवर यापुर्वी राज्य आंधप्रदेश येथील वेगवेगळ्या पोलीस ठाणे येथे एकुण ४१ घरफोडी/चोरीचे गुन्हे नोंद आहेत. तसेच राज्य तेलंगाणा येथील वेगवेगळ्या पोलीस ठाणे येथे एकुण ६ घरफोडी/चोरीचे गुन्हे नोंद आहेत. आरोपीची मोडस ऑपरेन्डी आरोपी हा रेल्वे नी प्रवास करून सोबत कॅप, तोंडाला मास्क आणि कॉलेज बॅग बाळगुण रेल्वे स्टेशन परिसरातुन मोटार सायकल चोरी करतो. त्यानंतर ती चोरी केलेली मोटार सायकल वापरून आजुबाजुच्या परिसरातील बंद घर पाहुन तिथे चोरी करतो. त्यानंतर चोरी केलेली मोटार सायकल ही रेल्वे स्टेशन परिसरात सोडुन देवुन परत रेल्वेनी आपले मुळ गावी परत जातो. आरोपी हा रेल्वेनी प्रवास करतांना कोणतेही टिकीट बाळगत नाही. आरोपी नाव व पत्ता व अटक तारीख वेळ चिन्नाबाबु व्यंकटेशवरलु गोरेला, वय ३२ वर्ष, व्यवसाय शिक्षण रा. २१-७-१९/बी, ३ री गल्ली कोरलामा पेट्टा, देवी चौक, राजमहेद्रंवरम (शहर) इस्ट गोदावरी राज्य आंधप्रदेश. दिनांक ०८/०७/२०२६ अटक करण्यात आली गुन्हयाची थोडक्यात हकिकत घटना ता. वेळी व ठिकाणी यातील नमुद फिर्यादीने पोलीस ठाणे बल्लारपुर येथे येवुन तोंडी तकार दिली की, दिनांक १९/०५/२०२६ रोजी फिर्यादी ही तिचे घराला लॉक करून आपले कामावर निघुन गेली. त्यानंतर ती कामावर घरी येवुन पाहिले असता तिचे घराचे लॉक तुटुन असुन घरातील लोखंडी आलमारीतील सोन्या-चांदीचे दागिणे कि.अं.२,८७,०००/- रू. व रोख रक्कम ५०००/- रू. असा एकुण २,९२,०००/- रू. चा मुदेदेमाल कुणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेला अशा फिर्यादीचे तोडी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला. उघडकीस आलेले गुन्हे 
१) पोलीस बल्लारपुर गुन्हा नोंद क.६०६/२०२६ कलम ३३१(३३३०५ भा.न्या.सं. 
२) पोलीस अधिकारी बल्लारपुर गुन्हा नोंद. ६०८/२०२६ कलम ३०३(२) भा.न्या.सं.
३) पोलीस बल्लारपुर गुन्हा नोंद कं. ७५१/२०२६ कलम ३०३ (२) भा.न्या.सं.
४) पोलीस अधिकारी राजुरा गुन्हा नोंद. ४२७/२०२६ कलम ३३१(३), ३३१(४), ३०५ भा.न्या.सं.
५) पोलीस अधिकारी राजुरा गुन्हा नोंद. ४५०/२०२६ कलम ३३१ (३), ३३१ (४), ३०५ भा.न्या.सं.
६) पोलीस अधिकारी राजुरा गुन्हा नोंद. ४८९/२०२६ कलम ३०३(२),६२ भा.न्या.सं.
७) पोलीस अधिकारी राजुरा गुन्हा नोंद कं. ५७६/२०२६ कलम ३०३ (२) भा.न्या.
८) राजस्थान चंद्रपुर शहर गुन्हा नोंद कं. ३३९/२०२५ कलम ३३१(३),,३३१(४), ३०५ भा.न्या.सं.
९) पोलीस अधिकारी रामनगर नोंद कं. १०२८/२०२५ कलम ३३१ (३), ३३१ (४), ३०५ भा.न्या.सं.
जप्त मुददेमाल १) एक हिरो होन्डा पॅशन प्रो. मो. सा. क. एम.एच.३४ बी.एम. ५१३० कि. ४०,०००/- उदा. २) हिरो होन्डा स्प्लेंडर मो. सा. क. एम.एच ३४ बी. ई. १९९५९ कि. ३०,०००/- रु. ३) एक डेस्टीनी कंपनीची मोपेड क. एम.एच ३४ सी.सी. ३२७५ कि. ५०,०००/- रु. ४) सोन्या चे दागिने कि. अं. ३,२०,०००/- रू. (आरोपीने राजमुंढरी येथे गोल्ड कंपनीमध्ये विकी केले असून हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ५) चांदीचे दागिने कि. अं. २५,०००/- रु. असा एकूण ४,६५,०००/- रू. चा मुददेमाल
         सदर गुन्हयाचे गांर्भीय ओळखुन मा. पोलीस अधिक्षक आयुष नोपानी, मा. अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस घरफोडी करणारे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढुण त्यांचेवर कारवाई करून, मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे निर्देश दिले होते. सदर आदेशा प्रमाणे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक दिपक कांकेडवार, सपोनि बलराम झाडोकार व स्टॉफ यांचे एक पथक तयार करून घरफोडी उघड आणणेबाबत सुचित करण्यात आले होते. यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने आजुबाजुचे परिसरातील सि.सि.टी.व्ही. फुटेज, तांत्रीक माहिती व गोपनीय माहितीच्या आधारे माहिती प्राप्त करून सदर गुन्हयातील आरोपींस निष्पन्न करून आरोपीचा शोध कामी राजमुदंरी (राजमहेंद्रवरम) राज्य आंध्रप्रदेश येथुन ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी तेलंगाणा येथील पोलीस अंमलदार नरेश दत्त यांनी आरोपीची ओळख पटविण्यास मोलाची मदत केली. सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन यापुर्वी त्याचेवर आंधप्रदेश व तेलंगाणा राज्यात एकुण ४७ घरफोडी/चोरीचे गुन्हे नोंद आहेत. सदर आरोपी व जप्त मुदेदेमाल पुढील तपास कामी पोलीस ठाणे बल्लारपुर यांचेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस ठाणे बल्लारपुर करित आहेत. सदर आरोपीकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या