Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

BANRF फेलोशिपमधील संशोधकांची संख्या ३०० करण्याची मागणी; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा पुण्यात बार्टीला निवेदन (Demand to increase the number of BANRF fellowship researchers to 300; Samyak Vidyarthi Andolan submits memorandum to BARTI in Pune.)

BANRF फेलोशिपमधील संशोधकांची संख्या ३०० करण्याची मागणी; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा पुण्यात बार्टीला निवेदन (Demand to increase the number of BANRF fellowship researchers to 300; Samyak Vidyarthi Andolan submits memorandum to BARTI in Pune.)

पुणे : आज पुण्यात सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या महासंचालकांना निवेदन देत Dr. Babasaheb Ambedkar National Research Fellowship (BANRF) योजनेतील लाभार्थी संशोधकांची संख्या १०० वरून किमान ३०० करण्यात यावी, तसेच सन २०२३, २०२४, २०२५ आणि २०२६ या वर्षांसाठीची जाहिरात पुढील सात दिवसांत प्रसिद्ध करावी, अशी मागणी करण्यात आली. सम्यक विद्यार्थी आंदोलकांनी निवेदनात म्हटले आहे की, बार्टीमार्फत राबविण्यात येणारी BANRF योजना अनुसूचित जातीतील पीएच.डी. संशोधकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, शासन निर्णयानुसार या योजनेत केवळ १०० संशोधकांना लाभ दिला जातो. राज्यातील पात्र आणि गुणवंत संशोधकांची संख्या लक्षात घेता ही मर्यादा अत्यंत अपुरी असून त्यामुळे अनेक संशोधकांना फेलोशिपपासून वंचित राहावे लागत आहे. असे सम्यक विद्यार्थी आंदोलनाने निवेदनात म्हटले आहे.
          तसेच यामुळे लाभार्थी संशोधकांची संख्या किमान ३०० करण्यात यावी आणि गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या २०२३, २०२४, २०२५ आणि २०२६ या वर्षांसाठीच्या BANRF योजनेची जाहिरात पुढील सात दिवसांत प्रसिद्ध करण्यात यावी, अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाने केली आहे. जर या मागण्यांवर सात दिवसांच्या आत सकारात्मक निर्णय न घेतल्यास राज्यभरातील संशोधकांना सोबत घेऊन बार्टी कार्यालयासमोर संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला. यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रशांत बोराडे, संघर्ष शंखाड, प्रज्योत गायकवाड, अभिराज कांबळे, किरण साईंदाणे, चैतन्य इंगळे आदी उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या