Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

ब्रिक्स परिषदेसाठी आलेल्या ११ देशांतील सुमारे १५० प्रतिनिधी आणि अधिकारी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या भेटीवर, वन्यजीवाशी हितगुज साधणार....! (Around 150 delegates and officials from 11 countries, here for the BRICS summit, are set to visit the Tadoba-Andhari Tiger Reserve and commune with the wildlife...!)

ब्रिक्स परिषदेसाठी आलेल्या ११ देशांतील सुमारे १५० प्रतिनिधी आणि अधिकारी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या भेटीवर, वन्यजीवाशी हितगुज साधणार....! (Around 150 delegates and officials from 11 countries, here for the BRICS summit, are set to visit the Tadoba-Andhari Tiger Reserve and commune with the wildlife...!)

चंद्रपूर -: नागपुरात ब्रिक्स परिषद होऊ घातली आहे. या परिषदेला अकरा देशांतील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. या विदेशी पाहुण्यांसाठी रविवारी (ता. १२) ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात दुपारची विशेष जंगल सफारीचे आयोजन करण्यात या आंतरराष्ट्रीय दौऱ्यामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळक स्थान मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. केंद्रिय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या परिषदेत भारतासह ब्राझिल, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका आणि इतर ब्रिक्स सदस्य राष्ट्रांतील परिवहन मंत्री व वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले आहेत. लवचिकता, नावीन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी बांधणी हा परिषदेचा मुख्य विषय आहे. शाश्वत वाहतूक, हरित इंधन, शहरी गतिशीलता, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल वाहतूक व्यवस्था, लॉजिस्टिक साखळी आणि रेल्वे संशोधन यासारख्या विषयांवर चर्चा होत आहे. नागपुरातील बैठकीनंतर ११ देशांतील सुमारे १५० प्रतिनिधी आणि अधिकारी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देणार आहेत. वन विभागाने त्यांच्या स्वागतासाठी आणि सफारीसाठी विशेष नियोजन केले आहे. विदेशी प्रतिनिधींचे निवास व भोजनाची व्यवस्था वन्य विलास रिसॉर्ट येथे करण्यात येणार आहे. कोलारा आणि मादनापूर पर्यटन प्रवेशद्वारांमधून विशेष जंगल सफारी आयोजित केली जाणार आहे. या आंतरराष्ट्रीय दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ताडोबाचे प्रमुख प्रवेशद्वार असलेल्या कोलारा मार्गावर स्वच्छता, रंगरंगोटी आणि सौंदर्याकरणाची कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहेत. रस्त्यांच्या दुतर्फा स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणे, विविध शासकीय इमारतींची रंगरंगोटी करण्यात येत आहे. विदेशी पाहुण्यांसमोर ताडोबा परिसराची सकारात्मक आणि आकर्षक प्रतिमा उभी राहावी यासाठी प्रशासन आणि संबंधित यंत्रणा विशेष प्रयत्न करताना दिसत आहेत. पाहुण्यांना विदर्भाच्या नैसर्गिक सौंदर्यासह स्थानिक संस्कृती, लोकपरंपरा आणि पारंपरिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या