स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, बल्लारपूरात अवैध पिस्टल व ४ जिवंत काडतुसासह एका युवकाला अटक (Local Crime Branch action: Youth arrested in Ballarpur with an illegal pistol and four live cartridges.)
बल्लारपूर :- जिल्ह्यात अवैध शस्त्रधारकांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत बल्लारपूर शहरातील एका युवकाला देशी बनावटीचे पिस्टल आणि ४ जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले.सलमान खान मजिद खान पठाण (वय २८ वर्षे), रा. दादाभाई नौरोजी वॉर्ड, बल्लारपूर असे आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, दि. ४ जून २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली. यावेळी आरोपी सलमान खान मजिद खान पठाण (वय २८ वर्षे), रा. दादाभाई नौरोजी वॉर्ड, बल्लारपुर याच्या ताब्यातून विनापरवाना बाळगण्यात आलेले एक देशी बनावटीचे पिस्टल आणि चार जिवंत राऊंड जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या अग्निशस्त्र व काडतुसांची अंदाजे किंमत ३९ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात अप. क्र. ६५१/२०२६ अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३ व २५ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आले असून आरोपीने हे शस्त्र कुठून आणले, त्याचा वापर कोणत्या हेतूने केला जाणार होता, तसेच या प्रकरणामागे कोणते मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचा तपास आता पोलीस करीत आहेत. आरोपीला पुढील तपासासाठी बल्लारपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या राजुरा उपविभागीय पथकाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक दिपक कांक्रेडवार, पोउपनि संतोष निंभोरकर, सफौ स्वामीदास चालेकर, पोहवा किशोर वैरागडे,पोहवा अजय बागेसर, पोअं गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर यांनी केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या