Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्य पदांचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू चंद्रपूर तालुक्यात 10 ते 12 जूनदरम्यान विशेष ग्रामसभा ; नागरिकांनी उपस्थित राहण्याचे तहसीलदारांचे आवाहन (The process of determining seat reservations for the Gram Panchayat general elections has commenced; special Gram Sabhas are scheduled in Chandrapur Taluka between June 10 and 12, and the Tehsildar has appealed to citizens to attend.)

चंद्रपूर :- सन 2024 व 2025 मध्ये मुदत संपलेल्या तसेच सन 2026 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्य पदांच्या आरक्षणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 10(2) (ब) अन्वये चंद्रपूर तालुक्यातील संबंधित ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा घेऊन आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. या ग्रामसभांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण महिलांसाठी राखीव जागांचे आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित केले जाणार आहे. त्यासाठी संबंधित गावांतील नागरिकांनी विशेष ग्रामसभेला उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार विजय पवार यांनी केले आहे.
              चंद्रपूर तालुक्यातील वढा, सिदुर, सिनाळा, नागाडा (सि), मोरवा, माराडा, नकोडा, उर्जानगर, शेनगाव, देवाडा, पिंपळखुट, बेलसनी, कोसारा व पायली भटाली आदी ग्रामपंचायतींसाठी विशेष ग्रामसभा 10 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. अजयपुर, पांढरकवडा, पद्मापूर, साखरवाही, ताडाली, पिपरी, उसगांव, चक निंबाळा, निंबाळा, चिचपल्ली, आरवट, म्हातारदेवी, वरवट व शिवनीचोर आदी ग्रामपंचायतींसाठी 11 जून रोजी सकाळी 10 वाजता ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. तसेच बोर्डा (ईदा), नागाडा (म), विचोडा रैत., गोंडसावरी, सोनेगांव, वेंडली, छोटा नागपूर, दुर्गापुर, वायगाव मो.,कोळसा, मोहुर्ली, पडोली, लोहारा व आंबोरा या ग्रामपंचायतींसाठी 12 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता विशेष ग्रामसभा घेण्यात येणार आहे. आरक्षण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे, असे तहसीलदार कार्यालय, चंद्रपूर यांनी कळविले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या