बल्लारपूरात काँग्रेसचा एल्गार, इंधन दरवाढ व महागाई विरोधात भव्य जनआंदोलन (Congress Launches Massive Protest in Ballarpur: A Grand Mass Movement Against Fuel Price Hikes and Inflation.)
बल्लारपूर :- पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅसच्या सातत्याने वाढणाऱ्या दरांविरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने शुक्रवारी २९ मे रोजी बल्लारपूर येथे भव्य जनआंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित या आंदोलनात काँग्रेसच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देशातील वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदविला. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, युवक, महिला तसेच वाहनधारकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून जनतेचे जीवनमान खालावत चालल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्या सूचनेनुसार हे आंदोलन पार पडल्याचे आयोजकांनी सांगितले. यावेळी उपस्थित नेत्यांनी केंद्र सरकारवर टीका करत तहसीलदार रेणुका कोकाटे यांच्या मार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. इंधन दरवाढ तात्काळ कमी करावी, घरगुती गॅसच्या किमती नियंत्रणात आणाव्यात तसेच वाढत्या महागाईपासून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. जनतेच्या प्रश्नांवर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून संघर्ष करत राहील, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला. आंदोलनादरम्यान परिसर घोषणांनी दणाणून गेला होता. या आंदोलनात शहर काँग्रेस अध्यक्ष अब्दुल करीम, नगराध्यक्षा अल्का वाढई, नगर परिषद उपाध्यक्ष देवेंद्र आर्य, तालुका काँग्रेस अध्यक्ष गोविंदा उपरे, तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा अफसाना सय्यद, महिला शहर अध्यक्षा ॲड. मेघा भाले, नासीर खान, नाना बुंदेल, दिलीप माकोडे, नगरसेविका वैशाली हुमने, प्रियंका थुलकर, वैष्णवी जुमडे, नगरसेवक अन्नू मातंगी, हेमंत मानकर, प्रीतम पाटील, युवक काँग्रेस अध्यक्ष नरेश गुंडापेल्ली, नगरसेवक भास्कर माकोडे, कैलाश धानोरकर, अजय जुमडे, नरसिंह रेब्बावार, नगरसेवक सय्यद मुकद्दर, मेहमूद पठाण, सादिक भाई, कलीम भाई यांच्यासह महिला काँग्रेस, एनएसयूआय, सेवादल तसेच काँग्रेसच्या विविध सेल व विभागांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या