Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

चंद्रपुरात 93 गुंतवणुकदारांची 2 कोटी 77 लाखांनी फसवणूक आरोपींबाबत माहिती असल्यास आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क करण्याचे आवाहन (93 Investors Defrauded of ₹2.77 Crores in Chandrapur; Appeal Issued to Contact the Economic Offences Wing with Information Regarding the Accused.)

चंद्रपुरात 93 गुंतवणुकदारांची 2 कोटी 77 लाखांनी फसवणूक आरोपींबाबत माहिती असल्यास आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क करण्याचे आवाहन (93 Investors Defrauded of ₹2.77 Crores in Chandrapur; Appeal Issued to Contact the Economic Offences Wing with Information Regarding the Accused.)

चंद्रपूर -: कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास कमी दिवसात जास्त परतावा तसेच प्लॉट बुकिंग केल्यास 10 ग्रॅम सोने व पैसे अशा प्रकारचे विविध आमिष दाखवून चंद्रपुरात 93 गुंतवणुकदारांची 2 कोटी 77 लाख 48 हजार 926 रुपयांनी फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी गडचांदूर येथील रहिवासी रेवनाथ आनंदराव एकरे (वय 46) यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिस स्टेशन, चंद्रपूर येथे 1) मोतीलाल दुलाल सरकार 2) बेल्लारी व्यंकटाचारी आणि 3) अनुमंडला महेंदर रेड्डी या तीन आरोपींविरुध्द 18 नोव्हेंबर 2022 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. सदर आरोपींबाबत कोणतीही माहिती असल्यास संबंधितांनी आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथे त्वरीत संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हैद्राबाद येथील टेकुला मुक्तीराज यांनी ग्रँड फॉर्च्युनर इन्फ्रा डेव्हलपर्स या नावाची कंपनी स्थापन करून त्या कंपनीचे एजंट 1) अमोल गणेश महाजन, चंद्रपूर, 2) भालचंद्र किसन वडस्कर, रा. उपरवाही, ता. गडचांदूर 3) अंजन्ना बेलम, रा. रयतवारी, चंद्रपूर 4) मोतीलाल सरकार, रा. बंगाली कॅप्म, चंद्रपूर यांच्या मदतीने फिर्यादी व इतर गुंतवणुकदारांना ग्रँड फॉर्च्युनर इन्फ्रा डेव्हलपर्स कंपनीबद्दल माहिती दिली. तसेच या कंपनीमध्ये 1 लक्ष 10 हजार रुपये भरल्यास 5 ग्रॅम सोने मिळणार व प्रत्येक दिवशी 935 रुपये असे 200 दिवस भेट मिळेल. 5 लक्ष रुपयांचे प्लॉट घेतल्यास 500 दिवसांमध्ये प्लॉटची रक्कम परत मिळणार आणि प्लॉट बुकिंगकरीता 1 लक्ष 65 हजार रुपये भरल्यास 10 ग्रॅम सोने मिळणार, असे कमीत कमी दिवसात जास्त परताव्याचे आमिष दाखविले.
         फिर्यादी रेवनाथ एकरे यांनी आपल्या 14 सहका-यांच्या मदतीने सदर कंपनीमध्ये 2 कोटी 36 लक्ष 60 हजार गुंतवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादिच्या तक्रारीवरून आरोपींविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर करीत आहे. तपासादरम्यान चंद्रपूर येथील 93 गुंतवणुकदारांची 2 कोटी 77 लक्ष 48 हजार 926 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. या गुन्ह्यातील आरोपी बेल्लारी व्यंकटाचारी आणि अनुमंडला रेड्डी यांनी ग्रँड फॉर्च्युनर इन्फ्रा ॲण्ड डेव्हलपर्स फर्म तेलंगणा येथे स्थापन केली व तीच फर्म आरोपी टेकुला मुक्तीराज याने चंद्रपूरमध्ये सुरू केली होती. सदर गुन्ह्यातील आरोपी 1) मोतीलाल दुलाल सरकार, रा. दुर्गा माता मंदीरजवळ, बंगाली कॅम्प, चंद्रपूर 2) बेल्लारी व्यंकटाचारी, रा. प्लॉट क्रमांक 303, साई बालाजी कॉप्लेक्स, एनएफसी कॉलनी कलामंदिर, बंडलगुडा, गोळकोंडा, हैद्राबाद 3) अनुमंडला महेंदर रेड्डी रा. बालाजी हिल्स कॉलनी, मेडचल, तेलंगणा हे गुन्हा दाखल तारखेपासून पाहिजे आहेत. सदर आरोपीबाबत आपापल्या परिसरात कोणतीही माहिती असल्यास आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथे कळवावे. तसेच पोलिस नियंत्रण कक्ष 07172 – 273258, 264702 या क्रमांकावर, पोलिस निरीक्षक संतोष शेगावकर (मो. 8888188529) आणि पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर चिकनकर (मो. 9359258365) यांना त्वरीत संपर्क साधावा, असे आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूरचे तपास अधिकारी श्री. चिकनकर यांनी कळविले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या