जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बल्लारशाह वनपरीक्षेत्रात विविध उपक्रमांद्वारे पर्यावरण दिन उत्साहात साजरा (World Environment Day celebrated with enthusiasm through various activities in the Ballarshah Forest Range.)

बल्लारपूर :- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बल्लारशाह वनपरीक्षेत्रात विविध उपक्रमांद्वारे पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी बल्लारशाह शहरात परीक्षेत्र कार्यालय परिसरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. ही रॅली परीक्षेत्र कार्यालय ते बल्लारशाह बस स्थानक परिसर आणि पुढे बामणी वन उपज नाक्यापर्यंत जाऊन पुन्हा परीक्षेत्र कार्यालयात येऊन संपन्न झाली. रॅलीनंतर परीक्षेत्र कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देत पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
             या कार्यक्रमास उपवनसंरक्षक श्री. योगेश वाघाये तसेच संयुक्त वन व्यवस्थापन समिती कारवा चे अध्यक्ष श्री. विनोद सिडाम यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन बल्लारशा वनपरीक्षेत्राचे वनपरीक्षेत्र अधिकारी श्री. राजेंद्र.डी. घारुडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक, वनपाल, कार्यालयीन कर्मचारी तसेच रोजंदारी मजूर यांनी मोलाचे सहकार्य केले. पर्यावरण जनजागृतीसाठी रॅली व वृक्षारोपणासारखे उपक्रम महत्त्वाचे ठरत असून, नागरिकांनीही पर्यावरण संवर्धनात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068