बल्लारपूर - बल्लारपूर येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, एनसीसी विभाग प्रमुख आणि हिंदी दैनिक 'महाविदर्भ'चे संपादक डॉ. प्रभात दुबे यांचे चंद्रपूर येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, ते चार धाम यात्रेवरून तीनच दिवसांपूर्वी चंद्रपूरला परतले होते. तसेच ते दोन दिवसांपासून घराबाहेर पडले नव्हते आणि त्यांच्या घराचा दरवाजाही उघडा नव्हता. यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये याबाबत संशय निर्माण झाला, त्यांनी पोलिसांना माहिती दिली. २७ मे रोजी सायंकाळी पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, डॉ. प्रभात दुबे हे मृतावस्थेत आढळून आले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला असून त्यांच्यावर 28 मे रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या