Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

चार निरपराध स्त्रियांचा बळी घेणाऱ्या टी-2 वाघीणीला पवनपार च्या जंगलात जेरबंद, मात्र दुःख कायम (Tigress T-2, responsible for the deaths of four innocent women, has been captured in the Pawanpar forest—yet the sorrow remains.)

चार निरपराध स्त्रियांचा बळी घेणाऱ्या टी-2 वाघीणीला पवनपार च्या जंगलात जेरबंद, मात्र दुःख कायम (Tigress T-2, responsible for the deaths of four innocent women, has been captured in the Pawanpar forest—yet the sorrow remains.)

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील गुंजेवाही जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या चार महिलांचा बळी घेणाऱ्या हल्लेखोर टी-2 वाघिणीला अखेर वनविभागाने जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. शनिवारी रात्री झालेल्या या कारवाईत वनविभागाच्या मोठ्या शोधमोहिमेला यश मिळाले असून, परिसरातील नागरिकांनी काही प्रमाणात सुटकेचा निश्वास सोडला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गुंजेवाही जंगलात 22 मे रोजी टी-2 वाघीणीने तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या 13 महिलांच्या गटावर हल्ला केला होता. दबा धरुन बसलेल्या वाघीणीच्या हल्ल्यात 13 पैकी चार महिलांचा मृत्यू झाला. वाघाच्या हल्ल्यात एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने मानवी हानी होण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना असल्याचं सांगण्यात आलं. या हल्ल्यानंतर गुंजेवाही गावात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं. नरभक्षक वाघाचा बंदोबस्त वनविभागाने करावा अशी मागणी केली जात होती. वाघीणीच्या हल्ल्याची ही घटना गुंजेवाही-पवनपार या मार्गावर असलेल्या खैरीचक परिसरातील जंगलात घडल्यानंतर वनविभागाने वाघीणीला पकडण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेतल्या. त्यानंतर ट्रॅप रचण्यात आला. 
        वनविभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पतनपार बीट कक्ष क्रमांक 282 मध्ये ही कारवाई करण्यात आली. संबंधित वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्याचे आदेश प्राप्त होताच विशेष पथकाने जंगल परिसरात युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू केली. विशेष म्हणजे, कारवाईच्या वेळी वाघिणीसोबत तिचे बछडे नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे वाघिणीच्या हालचाली व तिच्च्या बछडचांच्या सहास्थितीबाबत वनविभाग स्वतंत्र तपास करणार असल्याचे समजते. शनिवारी रात्री सुमारे सव्वासात वाजताच्या दरम्यान ट्रॅन्क्युलायझर डार्टद्वारे एका वाघावर वेध घेण्यात आला. सुरुवातीला अंधारामुळे डार्ट लागलेला प्राणी हल्लेखोर वाघीण आहे की अन्य वाघ, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, त्यानंतर वनविभागाने पडताळणी केली असता ती टी-2 वाघीण असल्याचे स्पष्ट झाले. तसेच हीच वाघीण गुंजेवाहीतील चार महिलांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे निष्पन्न झाले आहे. यानंतर 8 वाजताच्या सुमारास जेरबंद करण्यात आले. वाघिणीला जेरबंद करण्यात आल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. गावकऱ्यांनी या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या