Advertisement

Responsive Advertisement

महात्मा फुले महाविद्यालयाचा बारावीचा निकाल 76.92 टक्के; वाणिज्य शाखेत चमकदार यश (Mahatma Phule College's Class 12 Results at 76.92%; Stellar Success in the Commerce Stream.)

महात्मा फुले महाविद्यालयाचा बारावीचा निकाल 76.92 टक्के; वाणिज्य शाखेत चमकदार यश (Mahatma Phule College's Class 12 Results at 76.92%; Stellar Success in the Commerce Stream.)


बल्लारपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. या निकालात बल्लारपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाने 76.92 टक्के निकालाची नोंद करत समाधानकारक यश संपादन केले. महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा निकाल 82.43 टक्के लागला असून या शाखेत 74 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. कला शाखेत 18 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दोन्ही शाखांमध्ये विद्यार्थ्यांनी समाधानकारक कामगिरी केली. वाणिज्य शाखेत कु. आफ्रिन हसन शेख हिने 76.67 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. सिद्धार्थ संतोष गोडशेलवार याने 76 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर कु. दिशा गोविंदप्रसाद निषाद हिने 73 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. कला शाखेत कु. पूजा बंडू सहारे हिने 58.17 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांकाने यश मिळविले.
       इंग्रजी माध्यम (वाणिज्य) शाखेतही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या शाखेत 25 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यात 24 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये कु. आफ्रिन हसन शेख हिने 76.67 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला. कु. दिशा गोविंदप्रसाद निषाद हिने 73 टक्के गुणांसह द्वितीय, तर कु. वैष्णवी संतोष रविदास हिने 71.83 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय कायरकर, उपाध्यक्ष राजेश चिताडे, प्रभारी प्राचार्य डॉ. रजत मंडल तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या