Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

धक्कादायक! भद्रावतीत शिक्षकाची निर्घृण हत्या उघड, पत्नीनेच रचला पतीच्या खुनाचा कट हत्या प्रकरणात 4 व्यक्तींना अटक (Shocking! Brutal Murder of Teacher Uncovered in Bhadravati; Wife Masterminded Plot to Kill Husband—4 Arrested in the Case.)

धक्कादायक! भद्रावतीत शिक्षकाची निर्घृण हत्या उघड, पत्नीनेच रचला पतीच्या खुनाचा कट हत्या प्रकरणात 4 व्यक्तींना अटक (Shocking! Brutal Murder of Teacher Uncovered in Bhadravati; Wife Masterminded Plot to Kill Husband—4 Arrested in the Case.)

स्थानिक गुन्हे शाखा व भद्रावती पोलिसांची संयुक्त कारवाई 

चंद्रपूर :- भद्रावती पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या घोडपेठ परिसरात हनुमान मंदिराजवळ संशयास्पद अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाच्या प्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास करत धक्कादायक उलगडा केला आहे. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा खून त्याच्या पत्नीने सहकाऱ्यांच्या मदतीने कट रचून केल्याचे निष्पन्न झाले असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. २ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजताच्या सुमारास घोडपेठ येथील कर्मवीर शाळेजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती भद्रावती पोलीस ठाण्यास मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता मृत व्यक्तीच्या गळ्याभोवती प्लास्टिक पिशवी व त्यावर पांढरा दुपट्टा घट्ट आवळलेला आढळून आला. 
           घटनास्थळी मिळालेल्या मोबाईल फोनच्या कॉल डिटेल्सच्या आधारे मृताची ओळख रविंद्र तुळशीराम कुळमेथे (वय ४६), रा. मुधोली चेक नं. २, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली अशी पटली. ते जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. पोलिसांनी तत्काळ त्यांच्या पत्नी दिपमाला कुळमेथे हिला चौकशीसाठी बोलावले. मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय, भद्रावती येथे करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. तपासादरम्यान पोलिसांनी मृताची पत्नी दिपमाला हिची सखोल चौकशी केली असता खळबळजनक माहिती समोर आली. पतीकडून होत असलेल्या कथित त्रासातून मुक्त होण्यासाठी दिपमालाने वर्षा परचाके हिच्यासोबत संगनमत करून पतीच्या खुनाचा कट रचल्याचे उघड झाले. नागपूर येथे उपचारादरम्यान दोघींची ओळख झाली होती. याच काळात दिपमालाने आपली व्यथा वर्षाला सांगितली असता, पतीचा खून केल्याशिवाय सुटका नाही,” असा सल्ला वर्षाने दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. पूर्वनियोजनानुसार २९ एप्रिल रोजी दिपमालाने पती रविंद्र यांना दिघोरी येथे नातेवाईकांच्या लग्नासाठी बोलावले. लग्नानंतर त्यांना परत जाऊ दिले नाही. ३० एप्रिल रोजी सकाळी दिघोरी बसस्थानकाजवळ सोनू उर्फ प्रविण कालोकर व नाझीर अंसारी कार घेऊन आले. दिपमालाने पतीला त्या कारमध्ये बसवून आरोपींच्या ताब्यात दिले. त्यानंतर आरोपींनी रविंद्र यांना घोडपेठ परिसरातील सुनसान ठिकाणी नेऊन कारमध्येच गळा आवळून त्यांची हत्या केली. १ मे रोजी “काम झाले” असा फोन दिपमालाला आल्याचेही तपासात समोर आले आहे. घटनास्थळ पंचनामा, कॉल डिटेल्स, पोस्टमार्टम अहवाल व आरोपींच्या कबुलीजबाबाच्या आधारे हा पूर्वनियोजित खून असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी भद्रावती पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत आरोपी दिपमाला कुळमेथे व वर्षा परचाके यांना वरोरा येथून, तर सोनू उर्फ प्रविण कालोकर व नाझीर अंसारी यांना नागपूर येथून ताब्यात घेतले. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली कार (क्र. एमएच ३१ डीसी ८९१९) तसेच मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे 
            सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे स्थानिक गुन्हे शाख येथील सपोनि बलराम झाडोकार, पोउनि सवेश बेलसरे, पोउपनि संतोष निंभोरकर, पो. स्टे भद्रवती येथील स.पो.नि. विरेन्द्र केदारे, सपोनि संजय मिश्रा मपोउपनि प्रियका गेडाम, पो स्टे भद्रावती शोध पथकातील सफौ महेन्द्र बेसरकर, पो हवा. अनुप आस्टूनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, धर्मराज मुंडे. पोअ योगेश घाटोळे, सतोष राठोर, प्रेमकुमार बावनकर, रोहित चिटगिरे, मपोज करिश्मा जुनघरी तसेच स्थानिक गुन्हे शाख चे पोहेका नितीन कुरेकार, नितीन साळवे, प्रमोद कोटनाके, किशोर वैरागडे पोअ. अमोल सावे, गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर, दिनेश अराडे, वृषभ बारसिंगे यांनी केली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या