स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई सुमारे ८ किलो ७९५ ग्रॅम गांजा जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल (Local Crime Branch Operation: Approximately 8.795 kg of Ganja Seized; Case Registered Against Two Individuals.)

Vidyanshnewslive
By -
0
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई सुमारे ८ किलो ७९५ ग्रॅम गांजा जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल (Local Crime Branch Operation: Approximately 8.795 kg of Ganja Seized; Case Registered Against Two Individuals.)

चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखेला २ एप्रिल रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पोलीस रेकॉर्डवरील आरोपी अब्दुल शाहरूख अब्दुल रज्जाक (वय ३५), रा. दर्गावॉर्ड घुटकाला चंद्रपूर व त्याचा साथीदार मोबीन रा. चंद्रपूर यांनी रहमतनगर येथील केजीएन लॉनजवळील एका घरात भाड्याने खोली घेऊन गांजा साठवून ठेवला असल्याची माहिती मिळाली होती. चंद्रपूर शहरातील रहमतनगर परिसरात अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत सुमारे ८ किलो ७९५ ग्रॅम गांजा जप्त केला असून, या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे ८९ हजार १५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ छापा टाकला. कारवाईदरम्यान भाड्याने घेतलेल्या खोलीतून पिवळ्या रंगाच्या प्लास्टिक पोत्यामध्ये ठेवलेला गांजा हस्तगत करण्यात आला. एकूण ८ किलो ९१५ ग्रॅम वजनाच्या पदार्थामधून निव्वळ ८ किलो ७९५ ग्रॅम गांजा असल्याचे निष्पन्न झाले. तसेच गांजा भरण्यासाठी वापरलेले प्लास्टिक पिशव्या देखील जप्त करण्यात आल्या. 
            सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पार पडली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, सर्वेश बेलसरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुंगीकारक औषधीद्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)