राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्यांकडून योजनांचा आढावा (Review of Schemes by Members of the National Commission for Scheduled Castes)

Vidyanshnewslive
By -
0
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्यांकडून योजनांचा आढावा (Review of Schemes by Members of the National Commission for Scheduled Castes)

चंद्रपूर -: राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य वड्डेपल्ली रामचंदर यांनी सोमवारी (दि. 16) अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी असलेल्या योजनांचा आढावा घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सुचना दिल्या. यावेळी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे संचालक सुनीलकुमार बाबू उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक एम. रामानुजन, पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनूरी नरेश, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, खाजगी सचिव क्रांती कुमार, अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, अधिक्षक अभियंता (महावितरण) संध्या चिवंडे, पालिका प्रशासन अधिकारी डॉ. विद्या गायकवाड आदी उपस्थित होते.
             यावेळी वड्डेपल्ली रामचंदर म्हणाले, अनुसूचित जातीच्या नागरिकांना घरपट्टे किंवा घरकुल प्राधान्याने द्यावे. रोजगार, स्वयंरोजगारासाठी बँकांनी त्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, याबाबत जिल्हा अग्रणी बँकेने पाठपुरावा करावा. प्रधानमंत्री रोजगार गॅरंटी आणि मुख्यमंत्री रोजगार गॅरंटी योजनेची मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. अनुसूचित जातीच्या लोकांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी उद्योग विभागाने त्यांचे प्रस्ताव त्वरीत बँकांकडे पाठवावे. अत्याचाराच्या घटना घडल्या तर त्यावर पोलिस विभागाने त्वरीत पीडितांना न्याय द्यावा. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची माहिती द्यावी, अशा सुचना त्यांनी केल्या. यावेळी रामचंदर यांनी अनुसूचित जातीच्या मुलामुलींची वसतीगृह प्रवेशस्थिती, शाळांची संख्या, केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता अभियान, आरोग्य आणि पोषण, ॲक्ट्रोसिटीची प्रकरणे, ग्रामीण पाणी पुरवठा, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन, महिला व बालविकास, बँकांची कर्ज प्रकरणे आदींचा आढावा घेतला.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)