जागतिक वन दिनाच्या निमित्ताने बल्लारशाह वनपरीक्षेत्राच्या माध्यमातून कारवा येथे वनराई बंधारा, वन्यप्राण्यांना आधार (On the occasion of World Forest Day, forest dam at Karwa through Ballarshah Forest Reserve, support for wildlife)

Vidyanshnewslive
By -
0
जागतिक वन दिनाच्या निमित्ताने बल्लारशाह वनपरीक्षेत्राच्या माध्यमातून कारवा येथे वनराई बंधारा, वन्यप्राण्यांना आधार (On the occasion of World Forest Day, forest dam at Karwa through Ballarshah Forest Reserve, support for wildlife)

बल्लारपूर :- जागतिक वन दिन निमित्त बल्लारशाह वनपरीक्षेत्रात पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम राबविण्यात आला. वनपरीक्षेत्रातील कारवा येथील सुमो नाल्यावर वन विभागाच्या पुढाकारातून वनराई बंधारा बांधण्यात आला. या उपक्रमात वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पर्यटन सफारीमधील मार्गदर्शक (गाईड), वाहन चालक तसेच रोजंदारी कामगारांनी सक्रिय सहभाग नोंदविला. जलसंधारण व वनसंवर्धनाला चालना देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे वन विभागाने सांगितले. यावेळी क्षेत्र सहाय्यक देवराव टेकाम (कळमना), के. एन. घुगलोत (बल्लारशाह), ए. एस. पठाण (कारवा) यांच्यासह वनरक्षक सुधीर बोकडे, आशिष देवगडे, माया पवार, पूजा टोंगे, उषा घोळवे, वर्षा पीपरे, भारती तिवाडे, शीतल कुळमेथे, तसेच अनिल चौधरी, सुनील नन्नावरे आणि संयुक्त वनव्यवस्थापन समिती कारवा चे अध्यक्ष विनोद शिडाम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला आदेश कुमार शेडगे सहाय्यक वनसंरक्षक (वन व वन्य) मध्य चांदा वनविभाग, बल्लारशाह वनपरीक्षेत्र अधिकारी राजेंद्र. डी. घोरुडे प्रमुख उपस्थित होते. वनराई बंधाऱ्यामुळे पाण्याचे साठवण होऊन भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असून परिसरातील वनसंपदा आणि जैवविविधतेचे संवर्धन होणार आहे. तसेच उन्हाळ्यात पाण्याच्या टंचाईचा सामना करणाऱ्या वन्य प्राण्यांना या बंधाऱ्यामुळे पाण्याची उपलब्धता होऊन त्यांनाही मोठा फायदा होणार आहे. वन विभागाच्या या उपक्रमाचे स्थानिक स्तरावर स्वागत करण्यात येत आहे. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)