बल्लारपूरात जुने बसस्थानक सब्जी मंडी परिसरातील विद्युत ट्रान्सफार्मरला आग, अग्निशमन विभागाच्या तत्परतेने हानी टळली (Fire Breaks Out at Electrical Transformer Near Old Bus Stand and Vegetable Market Area in Ballarpur; Major Damage Averted Due to Prompt Response by Fire Department.)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील जुना बस स्टँड, बुद्ध नगर परिसरातील सब्जी मंडी येथे असलेल्या एका विद्युत डीपीला आज सायंकाळच्या 5:30 वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, संबंधित डीपीमध्ये यापूर्वीही वारंवार शॉर्ट सर्किट होऊन ठिणग्या निघत असल्याचे नागरिकांनी सांगितले. 
           घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ अग्निशामक दल व पोलिसांना कळविले. अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे नागरिकांनी वीज वितरण विभागाने तातडीने दखल घेऊन आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. या घटनेची पुढील तपासणी संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)