पुणे :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागाच्या मार्गदर्शनाखाली, पद्मपाणी फाऊंडेशन आणि अभिजात भावी भाषा संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने येत्या २२ मार्च रोजी पुणे येथे 'अखिल भारतीय पाली साहित्य संमेलना'चे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी बनारस हिंदू विद्यापीठातील (BHU) पाली व बौद्ध अध्ययन विभागाचे माजी विभागप्रमुख आणि ज्येष्ठ विद्वान प्रा. डॉ. बिमलेंद्र कुमार यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीची अधिकृत घोषणा संमेलनाचे मुख्य आयोजक राहुल डंबाळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागाचे प्रमुख डॉ. महेश देवकर व स्वागताध्यक्ष डॉ. सिद्धार्थ धेंडे, सहस्वागताध्यक्ष डॉ. गौतम चाबुकस्वार आणि पद्मपाणी फाऊंडेशनच्या संचालिका सुवर्णा डंबाळे यांनी संयुक्तपणे केली आहे.
डॉ. बिमलेंद्र कुमार पाली साहित्यातील एक ऋषीमुल्य व्यक्तिमत्व प्रा. डॉ. बिमलेंद्र कुमार हे पाली भाषा आणि बौद्ध तत्त्वज्ञानातील जागतिक स्तरावरील मोठे नाव आहे. त्यांच्या निवडीमुळे या संमेलनाला वैचारिक उंची प्राप्त झाली आहे संशोधन व योगदान डॉ. कुमार यांनी पाली भाषेतील 'अभिधम्म' तत्त्वज्ञान, 'धम्मसंगणी' आणि 'भेषज्जमंजूषा' यांसारख्या कठीण ग्रंथांवर महत्त्वाचे संशोधन केले आहे. त्यांनी आतापर्यंत १९ हून अधिक ग्रंथांचे संपादन केले असून त्यांचे १२५ हून अधिक संशोधन लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ३५ हून अधिक विद्यार्थ्यांनी पीएच.डी. संपादन केली आहे. BHU व इतर कार्य त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठात (BHU) पाली विभागाचे प्रमुख म्हणून दीर्घकाळ सेवा दिली आहे. तसेच, त्यांची नुकतीच नेपाळमधील लुम्बिनी बौद्ध विद्यापीठात 'ICCR डॉ. बी.आर. आंबेडकर चेअर' चे पहिले प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी दिल्ली विद्यापीठ आणि विश्वभारती (शांतीनिकेतन) येथेही अध्यापन केले आहे. सन्मान त्यांच्या पाली भाषेतील योगदानासाठी त्यांना उत्तर प्रदेश राज्यपालांचा 'विशेष पुरस्कार' आणि अखिल भारतीय विद्वत परिषदेचा 'विद्वत भूषण' सन्मान प्राप्त झाला आहे. संमेलनाचे स्वरूप हे संमेलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागाच्या शैक्षणिक मार्गदर्शनाखाली होत असून, या माध्यमातून पाली साहित्याचा प्रचार, प्रसार आणि जतन करण्यावर भर दिला जाणार आहे. संमेलनासाठी देशभरातून पाली भाषेचे अभ्यासक आणि साहित्यिक पुण्यात उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे सहसंयोजक म्हणुन वैशाख फाऊंडेशन व इतर सामाजिक संस्था काम पाहणार आहेत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या