Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

जगाला सम्राट अशोक कसे माहीत पडले ? (How did the world come to know about Emperor Ashoka ?)

जगाला सम्राट अशोक कसे माहीत पडले ? (How did the world come to know about Emperor Ashoka ?)


वृत्तसेवा :- यासाठी मस्की येथील शिलालेखाचा अत्यंत महत्वाचा पुरावा उपलब्ध आहे. सम्राट अशोक इतिहासात होऊन गेले हे आपल्याला कशावरून कळते ? याचे सर्वात मोठे उत्तर म्हणजे शिलालेख आणि त्या शिलालेखांमध्ये मस्की येथील शिलालेख अत्यंत महत्त्वाचा आहे. पूर्वी भारतभर सापडलेल्या शिलालेखांमध्ये राजाचे नाव “देवानंप्रिय प्रियदर्शी” असे लिहिलेले होते पण हा राजा नेमका कोण याबाबत इतिहासकारांमध्ये संभ्रम होता मात्र कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील मस्की येथे सापडलेल्या शिलालेखात पहिल्यांदाच स्पष्टपणे “देवानंप्रिय अशोक” असे नाव लिहिलेले आढळले त्यामुळे “देवानंप्रिय प्रियदर्शी” आणि “अशोक” ही एकच व्यक्ती आहे हे निश्चित झाले. यामुळे इतिहासातील एक मोठा प्रश्न सुटला आणि शिलालेखातील देवानंप्रिय प्रियदर्शी म्हणजेच मौर्य सम्राट अशोक हे सिद्ध झाले. म्हणजे सम्राट अशोक हे केवळ कथेतला राजे नाही, तर स्वतःचे आदेश दगडावर कोरून ठेवणारे , लोकांना धम्म शिकवणारे आणि आजही शिलालेखांच्या रूपाने जिवंत असलेले ऐतिहासिक सम्राट आहेत. म्हणूनच मस्की शिलालेख हा सम्राट अशोक यांची ओळख पटवणारा सर्वात महत्त्वाचा पुरावा आहे. मस्की सोबत अजून दोन शिलालेख कर्नाटकमध्येच सापडले आहेत, उदयगोलम आणि नेतूर या दोन ठिकाणी, त्यांच्यावर देखील " असोक" हे नाव आले आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेशातील गुर्जरा लघु शिलालेखावर सुद्धा सम्राटांचे नाव "असोक" असे लिहिले आहे. 1915 साली सापडलेला कर्नाटक राज्यातील रायचूर जिल्ह्यामधील मस्की हा लघु शिलालेख सर्वात पहिल्यांदा सापडला, त्यामुळे "देवानंपिय पियदस्सी" ची ओळख "असोक" अशी पहिल्यांदाच झाली म्हणून हा शिलालेख सर्वात महत्त्वपूर्ण असा आहे.

संकलन :- सौरभ संजय भोसले 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या