सार्वजनिक ठिकाणी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी सवलतीचे 10 दिवस जाहीर (10 Concessional Days Announced for the Use of Loudspeakers and Amplifiers in Public Places)

Vidyanshnewslive
By -
0
सार्वजनिक ठिकाणी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी सवलतीचे 10 दिवस जाहीर (10 Concessional Days Announced for the Use of Loudspeakers and Amplifiers in Public Places)

चंद्रपूर :-  केंद्र शासनाच्या 10 ऑगस्ट 2017 च्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारीत नियम 2017 च्या नियम 5 उपनियम (3) नुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराबाबत श्रोतगृहे, सभागृह, सामुहिक सभागृह आणि मेजवाणी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षामध्ये १५ सवलतीचे दिवस निश्चित करून सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट जाहीर करण्याकरीता, जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
          त्यानुसार जिल्हादंडाधिकारी, चंद्रपुर यांनी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा वापर इतर ठिकाणी ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देण्यासाठी सन 2026 करीता सवलतीचे 10 दिवस जाहीर केले आहे. शिवजयंती - एक दिवस (19 फेब्र. 2026), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती - एक दिवस (14 एप्रिल 2026), ईद-ए-मिलाद – एक दिवस (26 ऑग. 2026) तथा (तिथीनुसार / चंद्रकलेनुसार), गणेश उत्सव –तीन दिवस (अनंत चतुर्दशी 25 सप्टेंबर 2026 व इतर दोन दिवस), नवरात्री उत्सव - दोन दिवस (अष्टमी दि. 18 ऑक्टोबर व नवमी दि. 19 ऑक्टोबर 2026), धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन - एक दिवस (16 ऑक्टो. 2026), 31 डिसेंबर – एक दिवस, आणि राखीव दिवस - पाच दिवस. गणेश उत्सवाचे दरम्यान दोन राखीव दिवस ठेवण्याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)