बल्लारपूर :- दिनांक 18/9/2026 ला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय चंद्रपूर अंतर्गत, महिलांचे संरक्षण, मुलींची सुटका, मुलींचे शिक्षण, हुंडा प्रथा नष्ट करणे, हुंडा बंदी आणि बालविवाह बंदी यांसारख्या सामाजिक नियमांची व योजनांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात, तथा योजनांचा प्रचार व जनजागृती करण्यासाठी सार्वजनिक जागरूकता कार्यक्रमांचे आयोजन पंचायत समिती, सभागृह बल्लारपूर येथे मा. मिनाक्षी भस्मे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या नेतृत्वात जिल्हा बाल संरक्षण कक्ष,सखी वन स्टॉप सेंटर, चाईल्ड लाईनच्या अंतर्गत बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान आणि सेवा संकल्प अभियानतर्गत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष तथा उदघाटक मा. धनंजय साळवे, गट विकास अधिकारी, पंचायत समिती, बल्लारपूर. कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे अजय साखरकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, अतिश चव्हाण, परिवेक्षक अधिकारी, परवीन शेख, बाल संरक्षण अधिकारी, बल्लारपूर, शुभांगी वऱ्हाटे, बाल विकास प्रकल्प अधिकारी, बल्लारपूर, अश्विनी कांबळे, वैध्यकीय अधिकारी, विसापूर, लता ठेमस्कार, गुरनुले पर्यवेक्षिका तर मार्गदर्शक प्रिया पिंपळशेंडे, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, समुपदेशिका, भास्कर ठाकूर, रेल्वे चाईल्ड लाईन, सुपरवाईझर, सखी वन स्टॉप सेंटरच्या केस वर्कर राणी खडसे, संजय खामणकर, हृदया संस्था, क्षेत्रीय अधिकारी, अर्चना टोंगे, समुपदेशिका, पो. स्टे. बल्लारपूर बबिता लोहकरे, सुपरवाईझर रेल्वे चाईल्ड हेल्प लाईन यांची उपस्थिती होती.
यावेळी बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान तथा सेवा संकल्प अभियाना विषयी तसेच बाल विवाह, पोक्सोअक्ट 2012,महिला व बाल विकास विषयक आरोग्य, पोषक व सामाजिक सुरक्षा,बालकांचे समुपदेशन, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे महत्त्व सांगण्यात आले. बाल संरक्षण जनजागृती, महिला स्वयं-साह्यता गट व आर्थिक सक्षमीकरण, जिल्ह्यात बालकांसाठी काम करणाऱ्या यंत्रणा बाल न्याय मंडळ, बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्प लाईन 1098/महिला हेल्प लाईन 181, विशेष किशोर पोलीस पथक, बाल गृह, निरीक्षण गृह, दत्तक यंत्रणा या विषयी माहिती. तसेच जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध यंत्रणा व योजनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. चाइल्ड हेल्पलाइन, महाराष्ट्रात बालकांसाठी उपलब्ध असलेल्या महत्वाच्या हेल्पलाईन आणि सेवा, सखी वन स्टॉप सेंटरच्या सेवा सुविधा, बाल संगोपन योजना, बालकामगार व बालमजुरी प्रतिबंध, बालविवाह प्रतिबंध, दत्तक प्रक्रिया तसेच अनाथ प्रमाणपत्र आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला व बालच्या सर्वांगीण विकासाबाबत जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमला बल्लारपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका यांची उपस्थिती प्रामुख्याने होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बबिता लोहकरे, यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन सविता भुते अंगणवाडी सेविका तर आभार सपना कोंडावर ने मानले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या