Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बल्लारपूरमध्ये व्हॉलीबॉलची रंगत ; खुली व ४५ वर्षांवरील स्पर्धा (Volleyball tournament held in Ballarpur on the occasion of Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti; open and over-45 age group competitions.)

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बल्लारपूरमध्ये व्हॉलीबॉलची रंगत ; खुली व ४५ वर्षांवरील स्पर्धा (Volleyball tournament held in Ballarpur on the occasion of Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti; open and over-45 age group competitions.)

बल्लारपूर :- छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधत बल्लारपूर स्पोर्ट्स बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने रविवार, ८ फेब्रुवारी २०२६ रोजी एकदिवसीय खुले व्हॉलीबॉल सामने तसेच ४५ वर्षांवरील वयोगटासाठी विशेष व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही क्रीडास्पर्धा महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या पटांगणावर होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन सकाळी १० वाजता उद्घाटन माजी नगराध्यक्ष लखनसिंह चंदेल यांच्या हस्ते होणार आहे समारंभाच्या अध्यक्षस्थानी बल्लारपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉ. अलका अनिल वाढई असतील. यावेळी महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय कायरकर, डॉ. रजनीताई हजारे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ, ठाणेदार बिपिन इंगळे, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रजत मंडल तसेच सामाजिक कार्यकर्ता महेश जीवतोडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
        अंतिम सामन्यानंतर स्पर्धेचा समारोप होणार असून समापन समारंभाच्या अध्यक्षपदी डॉ. अनिल वाढई राहतील. या वेळी नगर परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र आर्य, माजी नगराध्यक्ष हरिश शर्मा, माजी नगराध्यक्ष घनश्याम मूलचंदानी तसेच सामाजिक कार्यकर्ता राकेश सोमानी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. बल्लारपूरमध्ये प्रथमच पुरुषांच्या खुल्या गटातील तसेच ४५ वर्षांवरील खेळाडूंसाठी स्वतंत्र व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात येत असल्याने क्रीडा रसिकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. सर्व खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष व बल्लारपूर स्पोर्ट्स बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रमोद आवते यांनी केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या