वृत्तसेवा :- मुंबईतील शिक्षिका रुबल नांगी यांनी भारताचं नाव पुन्हा एकदा जागतिक पातळीवर उज्वल केलं आहे. दुबई येथे झालेल्या World Governments Summit दरम्यान त्यांना जगातील प्रतिष्ठित Global Teacher Prize प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासोबत मिळणारी बक्षीस रक्कम आहे १ मिलियन डॉलर्स (सुमारे ९ कोटी रुपये). का मिळाला हा मान? रुबल नागी यांनी शिक्षण कधीच वर्गापुरतं मर्यादित ठेवलं नाही. झोपडपट्टी, वंचित व दुर्लक्षित भागातील मुलांसाठी त्यांनी थेट भिंतींनाच शाळा बनवल्या. भित्तीचित्रांच्या माध्यमातून अक्षरओळख, गणित, स्वच्छता, आरोग्य आणि जीवनमूल्यांचे धडे देत त्यांनी हजारो मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवलं. त्यांचा “Living Walls of Learning” हा उपक्रम आज देशभरातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आदर्श मानला जातो. शिक्षण + समाजकार्य बदलाची खरी ताकद आज जिथे अनेकजण फक्त आकडे, निकाल आणि पदांच्या मागे धावत आहेत, तिथे रुबल नागी यांनी “शिक्षण म्हणजे सामाजिक परिवर्तन” हे कृतीतून दाखवून दिलं. शिक्षक हा केवळ अभ्यासक्रम शिकवणारा नसून समाज घडवणारा शिल्पकार असतो, याचं हे जिवंत उदाहरण आहे. गर्वाचा क्षण भारताच्या एका सामान्य शिक्षकाने केलेलं असामान्य कार्य आज संपूर्ण जगाने मान्य केलं आहे. हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नाही, तर देशातील प्रत्येक शिक्षकाचा, प्रत्येक शाळेचा आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा आहे. रुबल नागी यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! तुमची प्रेरणा लाखो शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ ठरो.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या