सामाजिक उपक्रम..! स्व.ऋषीदेव पाटील चौधरी आणि भाची स्व.प्रियंका शामराव छाया वाढई यांच्या स्मृतीदिना निमित्त स्कूलबॅगचे वाटप (Social initiative..! Distribution of school bags on the occasion of the memorial day of Late Rishidev Patil Chaudhary and niece Late Priyanka Shamrao Chhaya Vadhai)

Vidyanshnewslive
By -
0
सामाजिक उपक्रम..! स्व.ऋषीदेव पाटील चौधरी आणि भाची स्व.प्रियंका शामराव छाया वाढई यांच्या स्मृतीदिना निमित्त स्कूलबॅगचे वाटप (Social initiative..! Distribution of school bags on the occasion of the memorial day of Late Rishidev Patil Chaudhary and niece Late Priyanka Shamrao Chhaya Vadhai)


मूल :-  नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे नागपूर विभाग सहसचिव गुरुदास चौधरी व त्यांच्या भगिनी श्रीमती छायाताई वाढई यांचे तर्फे वडील स्व.ऋषीदेव पाटील चौधरी आणि भाची स्व. प्रियंका शामराव छाया वाढई यांच्या स्मृतीदिना निमित्त नुकतेच मुल तालुक्यातील चितेगाव येथील उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना १०८ स्कुलबॅगचे वाटप करण्यात आले. शाळेच्या आवारातील पटांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.रत्ना चौधरी, गुरुदास चौधरी, नयना गुरनुले आणि निलेश माथनकर यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी, शिक्षणाचे महत्त्व, सामाजिक दायित्व आणि पर्यावरण संवर्धन याविषयावर सविस्तर मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. सामाजीक दायित्व सांभाळत मृत्युपश्चात माणसाला जिवंत ठेवण्याचा हा एक सोपा उपाय आहे. विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हिच आमच्यासाठी पावती आहे असे रत्ना चौधरी यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन उपस्थित विद्यार्थ्यांपैकी श्रावणी नैताम तर आभार प्रदर्शन स्नेहल झरकर यांनी केले. याप्रसंगी रत्ना चौधरी महाराष्ट्र राज्य सहसचिव, गुरुदास चौधरी नागपूर विभाग सहसचिव, यशवंत देवगडे मुल तालुका संघटक, नंदा शेंडे मुल तालुका संघटीका, अर्चना बल्लावार तालुका संघटीका, श्रीमती छायाताई वाढई , श्रीमती नयना गुरनुले, सौ.रुपाली चौधरी, विप्लव चौधरी, हिमांशु वाढई, चितेगावच्या प्रथम नागरिक मा.सौ.कोमल रंधये श्री.मिलिंद रंधये अध्यक्ष शिक्षण समीती चितेगाव, श्री.लक्ष्मण बट्टे मुख्याध्यापक उ.प्रा.शा.चितेगाव, श्री. संजय गुरनुले सहा.शिक्षक, कु. रानी सहारे विषय शिक्षीका, कु.निलीमा कळंबे सहा.शिक्षीका, श्री.जी.सोनटक्के सर, श्री.निलेश माथनकर सहा .शिक्षक नवभारत विद्यालय मुल, श्री. सुनील चौधरी सहा.शिक्षक नवभारत विद्यालय मुल आणि शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. सदर सामाजिक उपक्रमाबद्दल संपूर्ण तालुक्यात गुरुदास चौधरी व त्यांच्या परिवार जणांचे कौतुक होत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)