गोल्डन मॅन असलेल्या भीमसैनिकाचे माता रमाईला जयंती दिनी अनोखे अभिवादन, माता रमाबाईंसाठी ३९ कोटींची साडी, कपाळी कुंकवाला ३२ कोटींचे हिरे...! (The 'Golden Man' Bhimsain offers a unique tribute to Mata Ramabai on her birth anniversary: a saree worth 39 crore rupees for Mata Ramabai, and diamonds worth 32 crore rupees for the vermilion mark on her forehead...!)
मुंबई :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विदेशात शिकता यावे म्हणून मुंबईत अतिशय गरिबीत दिवस काढून अनेक हालअपेष्टा सोसणाऱ्या त्यागमुर्ती माता रमाई यांची काल 7 फरवरी रोजी जयंती होती त्यांच्या जयंतीला तब्बल ३९ कोटींची साडी बनविण्यात येत आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार या साडीसाठी ३३ कोटींचे हिरे आणि दोन किलो सोन्याचा वापर होणार आहे. माता रमाईंच्या स्मरणार्थ गोल्डन मॅन रोहित पिसाळ यांनी ही संकल्पना असून. संपूर्ण साडीवर सोन्याचा मुलामा चढविण्यात येत आहे. माता रमाई यांच्या कपाळावरील कुंकवाच्या जागी ३३ कोटींचे हिरे लावण्यात येणार आहेत. जगातला कोणताही मुलगा आपल्या आईसाठी काहीतरी खरेदी करण्याचा प्रयत्न करतो. माझ्या आईसाठी माझ्या कमाईतून भेट देण्याचा निश्चय केला आहे, असे गोल्डन मॅन रोहित पिसाळ म्हणाले. ही साडी तयार झाल्यानंतर एक महिनाभर भारतभर फिरविण्यात येणार आहे. त्यानंतर लंडनच्या बकिंगहॅम पॅलेसमध्ये ही साडी प्रदर्शनासाठी देण्यात येईल, असे पिसाळ यांनी सांगितले. लंडनमध्ये उपाशी राहून बाबासाहेबांनी आमच्या बहुजन समाजासाठी अभ्यास केला. त्यासाठी माझ्या रमाई माऊलीने मोठा त्याग केला. मुंबईत खूप हलाखीचे दिवस काढले. बाबासाहेबांच्या आयुष्यात रमाई मातेचं मोठं योगदान राहिले आहे, अशा भावना पिसाळ यांनी व्यक्त केल्या.
रोहित पोपट पिसाळ हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध उद्योजक आहेत. 'गोल्डन मॅन' म्हणून त्यांची राज्यात ओळख आहे. पाण्याखालील सोन्याच्या खाणकामात त्यांचा व्यवसाय आहे. क्षुशा फॅशन हाऊसचे संस्थापक आहेत रोहित पिसाळ यांनी कठीण आजारातून सावरत, इंडोनेशियामध्ये सोन्याच्या खाणकामाचे प्रकल्प राबवले आहेत. ते सोन्याचे बुद्ध लॉकेट परिधान करण्यासाठी आणि त्यांच्या व्यावसायिक प्रवासासाठी चर्चेत असतात.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या