महात्मा फुले महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti celebrated at Mahatma Phule College)

Vidyanshnewslive
By -
0
महात्मा फुले महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti celebrated at Mahatma Phule College)


बल्लारपूर :- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे संचालित बल्लारपूर शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात रयतचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. 


         या निमित्ताने महाविद्यालयातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रजत मंडल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. 


          यावेळी मार्गदर्शन करतांना मान्यवरांनी म्हण्टले की," छत्रपती शिवाजी महाराज हे पराक्रमी व शिलवान राजे होते त्यांचे गडकिल्ले आजही पराक्रमाची साक्ष देत उभे आहे त्यांच्या सैन्यात विविध समुदायाचे मावळे होते जीं वेळेप्रसंगी आपल्या प्राणाचीही आहुती देण्यासाठी नेहमी तत्पर असायचे." 

 
       यावेळी डॉ. विनय कवाडे, डॉ. किशोर चौरे, डॉ. बादलशाह चव्हाण, डॉ. पंकज कावरे, डॉ. सतिश कर्नासे, प्रा. शुभांगी भेंडे, प्रा. ललित गेडाम, प्रा. दिवाकर मोहितकर, प्रा. रोशन साखरकर, प्रा. सोनोने, प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. राजेंद्र साखरे, प्रा. मोहनीश माकोडे, प्रा. दिपक भगत, प्रा. श्रद्धा कवाडे, प्रा. विभावरी नखाते, यांच्यासह सिद्धार्थ मोरे, शामराव दरेकर, अश्विनीताई ई ची उपस्थिती होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)