देशभरात विविध राज्यांत खासदार पदांच्या 37 जागांसाठी मतदान होणार, तर महाराष्ट्रात राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान (Voting will be held for 37 MP seats in various states across the country, while voting for 7 Rajya Sabha seats in Maharashtra will be held on March 16.)

Vidyanshnewslive
By -
0
देशभरात विविध राज्यांत खासदार पदांच्या 37 जागांसाठी मतदान होणार, तर महाराष्ट्रात राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान (Voting will be held for 37 MP seats in various states across the country, while voting for 7 Rajya Sabha seats in Maharashtra will be held on March 16.)


नवी दिल्ली :- देशभरातील विविध राज्यांतील खासदार पदांच्या जागांसाठी मतदान होणार आहे, तर महाराष्ट्रात राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्च 2026 रोजी मतदान होणार आहे. राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान होणार आहे, तर राज्यात पार्थ पवार निवडणूकीसाठी उभे राहण्याची शक्यता आहे. देशभरात राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत. देशातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. एप्रिल 2026 मध्ये देशातील राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने ही निवडणूक होणार आहे. देशभरातील विविध राज्यांतील जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातून 7 राज्यसभा जागांसाठी निवडणूक होणार आहे. देशातील निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, अर्ज भरण्याची अंतिम तारीख 5 मार्च 2026 निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर 6 मार्च 2026 रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे. तर उमेदवारांना माघार घेण्यासाठी ९ मार्च 2026 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. राज्यसभा निवडणूकीसाठी मतदानाची प्रक्रिया 16 मार्च 2026 रोजी पार पडणार आहे. मतदानाच्या दिवशीच सायंकाळी मतमोजणी सुरू होणार आहे. व राज्यसभा निवडणूकांचे निकाल त्यानंतर जाहीर केले जाणार आहेत. महाराष्ट्रातील 7 राज्यसभा जागांसाठी होणारी ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. विधानसभेतील पक्षीय संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील काही दिवसांत उमेदवारी अर्जांमुळे राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्यातून निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य शरद पवार, रामदास आठवले, फौजिया खान ,रजनी पाटील, प्रियांका चतुर्वेदी, धैर्यशील पाटील, भागवत कराड हे आहेत. महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्यसभेसाठी उमेदवार ठरला असल्याची माहिती मिळाली आहे. पार्थ पवार याना राज्यसभेवर घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्र राज्यात राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्च 2026 रोजी मतदान पार पडणार आहे. महायुतीच्या वाट्याला विधानसभेतील संख्याबळानुसार 6 जागा येणार आहे.
              देशभरातील महाराष्ट्र, ओडिसा, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, तेलंगणा या राज्यांमध्ये राज्यसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. राज्यसभेतील 7 जागांपैकी महायुतीला किमान 6 जागा मिळतील मात्र, या 6 जागांचे वाटप भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गटामध्ये कसे होणार, हे महत्वाचे आहे. भाजपला 4 जागा, तर शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांना प्रत्येकी एक जागा मिळणार आहे. राज्य विधानसभेचे सध्याचे संख्याबळ हे 286 इतके आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे 2 जागा रिक्त आहेत. एक जागा निवडून येण्यासाठी 37 आमदारांचा कोटा असणार आहे. सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 10, काँग्रेसचे 16 आणि उद्धवसेनेचे 20 असे 3 पक्षांचे मिळून 46 आमदार आहेत. माकप आणि शेकापचे प्रत्येकी एक सदस्य आहेत. मविआ एकत्र राहिली आणि या दोघांनी त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर एक खासदार निश्चितपणे निवडून जाईल. मात्र, त्या परिस्थितीत ती एक जागा उद्धवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यापैकी कोणाला द्यायची यावर एकमत व्हावे लागेल. 37 मतांचा कोटा पूर्ण केल्यानंतर मविआकडे 11 मते शिल्लक असतील. समाजवादी पार्टीचे 2 तर एमआयएमचे एक आमदार सोबत गेला तर 14 मते अतिरिक्त 11 असतील. भाजपचे 131, शिंदेसेनेचे 57, राष्ट्रवादीचे अजित पवार गट 40 असे मिळून 228 आमदार आहेत. 7 आमदारांचा त्यांना पाठिंबा असल्याने हे संख्याबळ 235 इतके आहे. त्यामुळे त्यांचे 6 उमेदवार राज्यसभेवर नक्कीच निवडून जातील. भाजपने 7 वा उमेदवार दिला तर मोठी लडत होणार आहे. तर आता देशभरात 37 राज्यसभा जागांसाठी निवडणुका होणार आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)