स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, कुख्यात शुटर सह अन्य 1 साथीदार अटकेत : ३ घरफोड्याचे गुन्हे उघड (Local Crime Branch action, notorious shooter and 1 other accomplice arrested: 3 burglary cases revealed)

Vidyanshnewslive
By -
0
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, कुख्यात शुटर सह अन्य 1 साथीदार अटकेत : ३ घरफोड्याचे गुन्हे उघड (Local Crime Branch action, notorious shooter and 1 other accomplice arrested: 3 burglary cases revealed)

चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी धडक कारवाई करत रेकॉर्डवरील आरोपी सरफरोज उर्फ शुटर याच्यासह एका साथीदाराला अटक करून पोस्टे रामनगर हद्दीतील तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले. आरोपींकडून सुमारे १९ लाख ६९ हजार ५०० रुपयांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशान्वये चंद्रपूर शहरात प्रोव्हिजन, जुगार रेड, मोटारसायकल चोरी व घरफोडी गुन्ह्यांतील आरोपींची तपासणी करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, गोपनीय माहितीदाराकडून मो. सरफरोज सगीर शहा (वय २५), रा. आमटे लेआउट, रयतवारी कॉलरी, चंद्रपूर याने रामनगर पोलीस ठाणे हद्दीतील इंदिरानगर परिसरात घरफोडी केल्याची माहिती मिळाली. 
             माहितीच्या आधारे पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. तसेच सद्दाम मुस्ताक शेख (वय ३०), रा. बँक ऑफ इंडिया मागे, घुग्घुस, ता. जि. चंद्रपूर यालाही अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी रामनगर पोलीस ठाणे हद्दीतील इंदिरानगर, कृष्णानगर व शामनगर परिसरात तीन ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यावरून आरोपींकडून गुन्ह्यात चोरी गेलेले सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण १९ लाख ६९ हजार ५०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील तपासासाठी दोन्ही आरोपींना रामनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, पोहवा सतिश अवथरे, पोहवा रजनिकांत पुठ्ठावार, पोहवा दिपक डोंगरे, पोहवा इम्रान खान, मपोहवा विजयमाला वाघमारे, मपोहवा निराशा तितरे, पोअं हिरालाल गुप्ता, पोअं किशोर वाकाटे, पोअ शशांक बदामवार यांनी केली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)