राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चंद्रपूरात, महाकाली मंदिरात दर्शन घेऊन फोडणार महायुतीच्या प्रचाराचा नारळ (The state's Chief Minister Devendra Fadnavis will be in Chandrapur today, where he will visit the Mahakali temple and officially launch the Mahayuti alliance's election campaign.)

Vidyanshnewslive
By -
0
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चंद्रपूरात, महाकाली मंदिरात दर्शन घेऊन फोडणार महायुतीच्या प्रचाराचा नारळ (The state's Chief Minister Devendra Fadnavis will be in Chandrapur today, where he will visit the Mahakali temple and officially launch the Mahayuti alliance's election campaign.)

चंद्रपूर :- मुनगंटीवार आणि जोरगेवार या दोन नेत्यांनी महानगरपालिका निवडणुकीत अगदी इच्छुक उमेदवारांच्या फॉर्म वाटपापासून ते एबी फॉर्म वाटपापर्यंत गटबाजीचं प्रदर्शन केलंय. त्यामुळे भाजपचे उमेदवार आणि समर्थक संभ्रमात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज रविवारी (4 जानेवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा चंद्रपूर महानगरपालिकेसाठी (Chandrapur Election 2026) प्रचार दौरा आयोजित करण्यात आलेला आहे. त्यामुळे फडणवीस या 2 नेत्यांमधला विसंवाद संपवतील का? हा खरा प्रश्न आहे. चंद्रपूर महानगर पालिकेच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज चंद्रपूर दौरा असणार आहे. सकाळी 9:30 वाजता महाकाली मंदिर येथे ते दर्शन घेतील. त्यानंतर अंचलेश्वर मंदिर ते जटपुरा गेट असा त्यांचा जवळपास दीड तासांचा रोड शो आहे. चंद्रपूर भाजपमधील वादानंतर आज चंद्रपुरात होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या रोड शो संदर्भात आणि भाजपा शिवसेना महायुतीच्या समन्वयासंदर्भात शनिवारी एक महत्त्वपूर्ण बैठक चंद्रपुरात पार पडली. राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे राज्य निवडणूक समन्वयक चंद्रशेखर बावनकुळे या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, माजी खासदार हंसराज अहिर, पक्षनिरीक्षक चैनसुख संचेती, अशोक नेते , पालकमंत्री अशोक उईके आणि चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सर्वच उमेदवारांना प्रचाराच्या संपूर्ण काळात घ्यावयाची काळजी व प्रचारासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वांनी मतभेद विसरून 51% मतांसह चंद्रपूर मनपात भाजपचा महापौर बनविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)