पोलीस रेझिंग डे निमित्त बल्लारपूर पोलीस स्टेशनचे जनजागृती कार्यक्रम तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेना अभिवादन...! (On the occasion of Police Raising Day, Ballarpur Police Station organized awareness programs and paid tribute to Krantijyoti Savitribai Phule...!)

Vidyanshnewslive
By -
0
पोलीस रेझिंग डे निमित्त बल्लारपूर पोलीस स्टेशनचे जनजागृती कार्यक्रम तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेना अभिवादन...! (On the occasion of Police Raising Day, Ballarpur Police Station organized awareness programs and paid tribute to Krantijyoti Savitribai Phule...!)

बल्लारपूर :- सेवा, शौर्य, समर्पण व विश्वास या ब्रीद वाक्य अंतर्गत महाराष्ट्र पोलीस दलाचा रेजिंग डे बल्लारपूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने दिनांक 2 जानेवारी ते 8 जानेवारी 2026 या कालावधीत नागरिकांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या प्रारंभी दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी वियाणी शाळा बल्लारपूर येथील विद्यार्थ्यांना बल्लारपूर शहर पोलीस स्टेशन येथे बोलवण्यात आले होते. यावेळी शाळेतील एकूण 30 विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच पोलीस दलातील विविध शस्त्रांची प्रात्यक्षिक रित्या माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी सर्व साधनांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला तसेच त्यांनी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत वापरात असलेल्या विविध वाहनांचीनांची माहिती उदा. डायल 112, पिटर मोबाइल, सेकंड मोबाईल इ. देण्यात आली. आपत्कालीन कार्य, शहरातील विविध भागातील पेट्रोलिंग व्यवस्था तसेच महिलांच्या सुरक्षितेची व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे सुरक्षेतेच्य जनजागृती बाबत थोडक्यात माहिती देण्यात आली. यावेळी पोलीस स्टेशन मधील पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनच्या दैनंदिन कामकाजाची सविस्तर माहिती दिली. यामध्ये डीबी कक्ष, गोपनीय कक्ष, सेशन पथक, निर्भया पथक, महिला संरक्षण कक्ष, वायरलेस रूम, मुद्देमाल कक्ष, पुरुष आरोपी व महिला आरोपी लॉकअप, सायबर कार्यालय, वाहतूक कार्यालय व अर्ज शाखा याबाबत माहिती देऊन विविध विभागाचे कार्य समजावून सांगण्यात आले. तसेच महिला पोलीस उपनिरीक्षक मोरे मॅडम यांनी पोस्को कायदा, महिलांची व मुलींची छेडछाड, बाल लैंगिक अत्याचार या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान सायबर शाखेचे पोलीस अंमलदार सचिन राठोड व भास्कर चिंचोलकर यांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडियाच्या गैरवापर बाबत सूचना देत 18 वर्षाखालील मुला- मुलींनी इंस्टाग्राम, whatsapp व facebook अकाउंट चा वापर करू नये तसेच सोशल मीडियावरील गैरवापराची माहिती पोलीस यंत्रणेकडे उपलब्ध असते असे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे लक्ष द्यावे असेही त्यांना सांगितले. या संपूर्ण कार्यक्रम चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व मुमक्का सुदर्शन साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे साहेब तसेच राजुरा उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडला. 


        पोलीस स्टेशन बल्लारपूर तर्फे सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मा. विपीन इंगळे पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून अभिवादन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस निरीक्षक विपिन इंगळे साहेब, पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन दिवटे, पोलीस उपनिरीक्षक सय्याम, पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड, मुद्देमाल कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक मनोहर मडावी, वाहतूक शाखेचे पोलीस स्टाफ, गोपनीय कक्षाचे पोलीस हवालदार महेंद्र वन्नकवार व त्यांचा स्टाफ, डीपी पथकाचे पोलीस स्टॉफ, पोस्को पथकाचे महिला अधिकारी मोरे मॅडम व त्यांचा स्टाफ, महिला कर्मचारी कल्याणी पाटील, अर्चना, प्रज्ञा कांबळे तसेच वियाणी शाळेचे शिक्षक श्री अनिल चापले सर, श्रीमती सोनाली आमटे मॅडम व विद्यार्थी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)