चंद्रपूरवर भाजप- शिवसेना महायुती भगवा फडकणार', चंद्रपूरच्या विकासात मुनगंटीवार, अहीर व जोरगेवार यांचे मोठे योगदान - ना. देवेंद्र फडणवीस ('The BJP-Shiv Sena grand alliance will hoist the saffron flag in Chandrapur', Mungantiwar, Ahir and Jorgewar have made significant contributions to the development of Chandrapur - Hon. Devendra Fadnavis)

Vidyanshnewslive
By -
0
'चंद्रपूरवर भाजप- शिवसेना महायुती भगवा फडकणार', चंद्रपूरच्या विकासात मुनगंटीवार, अहीर व जोरगेवार यांचे मोठे योगदान - ना. देवेंद्र फडणवीस ('The BJP-Shiv Sena grand alliance will hoist the saffron flag in Chandrapur', Mungantiwar, Ahir and Jorgewar have made significant contributions to the development of Chandrapur - Hon. Devendra Fadnavis)

चंद्रपूर :- चंद्रपूरमध्ये आयोजित विजय संकल्प रॅलीनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप-शिवसेना युतीला प्रचंड बहुमत मिळण्याचा विश्वास व्यक्त केला. चंद्रपूरच्या जनतेने दिलेल्या प्रतिसादातून हा विश्वास अधिक बळावला असल्याचे त्यांनी सांगितले. युतीच्या राजकारणात काहीवेळा पदे बाहेरच्यांना द्यावी लागतात, त्यामुळे काही त्याग करावे लागतात. चंद्रपूरकडे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याकडे पूर्ण लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. मनसेने ६६ बिनविरोध उमेदवारांच्या निवडीवर कोर्टात जाण्याच्या घेतलेल्या भूमिकेवर, फडणवीसांनी जनतेचा कौल महत्त्वाचा असल्याचे म्हटले. सुधीर मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील वादाच्या चर्चा त्यांनी फेटाळून लावल्या. मुनगंटीवार आमचे ज्येष्ठ नेते असून, जोरगेवार आमदार आहेत, त्यांच्यात कोणताही मनभेद नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. चंद्रपूरच्या विकासात मुनगंटीवार, हंसराज भैय्या आणि जोरगेवार यांचे मोठे योगदान आहे. भाजपशिवाय अन्य कोणीही विकासाचे असे काम दाखवू शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले


         राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज चंद्रपूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. चंद्रपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य रोड शो झाला. या रोड शोनंतर झालेल्या सभेतून मुख्यमंत्र्यांनी चंद्रपूरमध्ये- भाजप शिवसेनाच भगवा फडकेल असा विश्वास व्यक्त केला. "आज ज्या प्रकराचा रोड शो आपल्या सर्वांच्या उपस्थित मी पाहिला. तो पाहून आता मी दाव्याने सांगतो चंद्रपूरवर भाजप शिवसेनाच भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. मागच्या काळात आमचे सुधीरभाऊ हे पालकमंत्री असताना, हंसराज भैया खासदार असताना चंद्रपूर शहराचा चेहरा बदलवण्याचे काम केले. या चंद्रपूरमध्ये जर काही दिसत असेल तर त्याचे श्रेय भाजप- शिवसेना महायुतीचे आहे. भाजप शिवसेनेशिवाय इथे कोणी काम केले नाही. चंद्रपूरचा चेहरामोहरा बदलण्याचे काम भाजप शिवसेनेने केले आहे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान, चंद्रपूरचा कायापालट करण्याकरिता, चेहरा मोहरा बदलण्याकरिता एकदा भाजप- शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब करावे, चंद्रपूरकरांनो १५ तारखेला आमची काळजी तुम्ही घ्या, १६ तारखेपासून पाच वर्ष आम्ही तुमची काळजी घेऊ असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)