नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार चंद्रपूरपर्यंत, नागपूर - चंद्रपूर प्रवास लवकरच दोन तासांत (The Nagpur-Mumbai Samruddhi Expressway will be extended to Chandrapur, making the Nagpur-Chandrapur journey possible in just two hours.)

Vidyanshnewslive
By -
0
नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार चंद्रपूरपर्यंत, नागपूर - चंद्रपूर प्रवास लवकरच दोन तासांत (The Nagpur-Mumbai Samruddhi Expressway will be extended to Chandrapur, making the Nagpur-Chandrapur journey possible in just two hours.)

चंद्रपूर :- नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार चंद्रपूरपर्यंत करण्यासाठी नागपूर – चंद्रपूर द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. मुंबई – नागपूर प्रवास अतिजलद करण्यासाठी एमएसआरडीसीने ७०१ किमी लांबीचा समृद्धी महामार्ग बांधून सेवेत दाखल केला. या महामार्गाचा विस्तार करण्यासाठी नागपूर – चंद्रपूर, नागपूर – गोंदीया, भंडारा – गडचिरोली आणि जालना – नांदेड असे महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नागपूर – चंद्रपूर महामार्गाच्या सहा टप्प्यातील कामासाठी एमएसआरडीसीने निविदा मागविल्या होत्या, या निविदांना चांगला प्रतिसादही मिळाला होता. 
         राज्य सरकारने मान्यता दिल्यानंतर आता एमएसआरडीसीने नवीन संरेखनानुसार पर्यावरणीय मान्यतेसाठी नुकताच प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला आहे. हा प्रस्ताव मंजुर झाल्यानंतर भूसंपादन प्रक्रिया आणि निविदा प्रक्रिया पूर्ण करून महामार्गाच्या बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे. हा महामार्ग सेवेत दाखल झाल्यास नागपूर – चंद्रपूर अंतर केवळ दोन तासांत पार करता येणार आहे. या प्रकल्पासाठी नव्याने निविदा मागविल्या जाणार आहेत. तर दुसरीकडे या महामार्गाला पर्यावरण मान्यताही मिळालेली असताना या प्रकल्पात मोठ्या संख्येने वन क्षेत्र बाधित होत असल्याने त्यात काही बदल करून वन क्षेत्र वाचवता येईल का याचा विचार करत संरेखनामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे नव्याने पर्यावरणीय परवानगी घ्यावी लागली आहे. या निर्णयानुसार एमएसआरडीसीने नागपूर – चंद्रपूर महामार्गाचे नवीन संरेखन तयार केले आहे. या चार पदरी आणि २०४ किमीच्या महामार्गाच्या सुधारित संरेखनाला काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मान्यता दिली. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)