चंद्रपूर महापालिका निवडणुकीत अनेक माजी नगरसेवकांना करावा लागतोय नागरिकांच्या रोषाचा सामना....! (In the Chandrapur Municipal Corporation elections, many former corporators are facing the wrath of the citizens !)
चंद्रपूर :- भाजपच्या माजी नगरसेवक राहिलेल्या उमेदवारांना प्रभागात प्रचार करताना पदोपदी नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. माजी महापौर राखी कंचर्लावार यांचे माजी नगरसेवक पती संजय कंचर्लावार यांना बगड खिडकी येथील नागरिकांनी आठ वर्ष तुम्ही प्रभागात फिरले नाही, नाली , रस्ते व स्वच्छतेची कामे केली नाही, कचऱ्याचे ढीग लागले आहेत, नळाला एक थेंब पाणी आले नाही , आठ वर्ष तुमचा चेहरा दिसला नाही, वॉर्डातील समस्या घेऊन गेलेल्या तुम्ही मला मतदान केले नाही अशी उत्तरे देता असा प्रश्न करीत मग आता प्रचारासाठी प्रभागात कशाला आला असा जाब विचारला. तुम्ही कामे करणारच नसणार तर मते मागायला किंवा प्रचाराला या भागात येऊच नका असे म्हणून घेराव केला. आठ वर्ष झाले कचरा तिथेच पडून आहे, नागरिकांना कचऱ्याचा त्रास होत आहे. मात्र सफाईसाठी कुणी आले नाही, आठ वर्षापासून नळाला एक थेंब पाणी नाही, पाणी येत नसताना महापालिका बिल वसूल करीत आहे. यावर नगरसेवक म्हणून बोलायला तुम्ही तयार नाही, तेव्हा तुम्ही मते मागायला येऊच नका असेही संतप्त नागरिक म्हणाले.
महापालिका निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवार घरोघरी जाऊन मते मागण्यांवर जोर देत आहेत. भाजप उमेदवार तथा माजी महापौर राखी कंचर्लावार यांचे माजी नगरसेवक पती संजय कंचर्लावार शनिवारी बगड खिडकी भागात प्रचारासाठी गेले होते. मात्र तेथील संतप्त नागरिकांनी संजय कंचर्लावार यांना रस्त्यातच अडवून धरले. आमच्या बगड खिडकीत तुम्ही प्रचार करू नका, तुम्ही निवडून आल्यानंतर मागील आठ वर्षात दिसले नाही, प्रभागात इतक्या समस्या आहेत. मात्र तुम्ही एकही समस्येकडे लक्ष दिले नाही, तुमच्या कार्यालयात समस्या घेऊन आलेल्या नागरिकांना बगड खिडकी परिसरातील नागरिकांनी मला मतदान केले नाही, मी तुमची कामे करणार नाही असे थेट सांगत. नाली सफाई, रस्ते ही साठी कामेही या प्रभागात झालेली नाही, मग तुम्ही आठ वर्ष केले तरी काय असाही जाब नागरिकांनी विचारला. तेव्हा कंचर्लावार यांनी मागील साडेतीन वर्षापासून पालिकेत प्रशासक आहे असे सांगितले. मात्र मागील आठ वर्ष तर भाजपची सत्ता होती, महापौर तुमच्या पत्नीच होत्या. त्या काळात देखील कामे केली नाही असे खडे बोल सुनावले. तुम्ही आमच्या प्रभागात प्रचार करूच नका अशी तंबीही नागरिकांनी दिली. तुम्ही कामे करणारच नसणार तर मते मागायला किंवा प्रचाराला या भागात येऊच नका असे म्हणून घेराव केला. आठ वर्ष झाले कचरा तिथेच पडून आहे, नागरिकांना कचऱ्याचा त्रास होत आहे. मात्र सफाईसाठी कुणी आले नाही, आठ वर्षापासून नळाला एक थेंब पाणी नाही, पाणी येत नसताना महापालिका बिल वसूल करीत आहे. यावर नगरसेवक म्हणून बोलायला तुम्ही तयार नाही, तेव्हा तुम्ही मते मागायला येऊच नका असेही संतप्त नागरिक म्हणाले. हा प्रकार केवळ बगड खिडकी येथेच झाला असे नाही तर जटपुरा प्रभागातील जलनगर भागात भाजपच्या एका माजी महिला नगरसेविकेला नागरिकांनी अशाच प्रकारे तुम्ही कामे केली नाही, आता मते मागायला कशाला येता असा जाब विचारला. तर तुकूम प्रभागात महानगर जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार यांच्या प्रचार फलकावरील फोटोला शेण फासले. यावरून भाजप बद्दल मतदारांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या