महात्मा फुले महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी (Mahatma Phule College celebrated Swami Vivekananda Jayanti (National Youth Day) and Rajmata Jijau Jayanti with great enthusiasm.)

Vidyanshnewslive
By -
0
महात्मा फुले महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी (Mahatma Phule College celebrated Swami Vivekananda Jayanti (National Youth Day) and Rajmata Jijau Jayanti with great enthusiasm.)


बल्लारपूर :- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बल्लारपूर द्वारे संचालित स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना एनसीसी विभाग, सांस्कृतिक विभाग व रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद यांची जयंती 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंतीचा संयुक्त कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमा चे अध्यक्ष म्हणून डॉ. पंकज कावरे लाभले, तर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. रजत मंडल, प्रभारी प्राचार्य  मा. सचिन तल्लार, समुपदेशक ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर, सौ. स्मिता काकडे ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर, सौ. श्रुती तल्लार, संकल्प बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर, प्रा. ले. योगेश टेकाडे, एनसीसी विभाग प्रमुख विचार मंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सैन्य विज्ञान विभाग प्रमुख प्रा. योगेश टेकाडे यांनी केले. प्रमुख अतिथी सचिनजी तल्लार यांनी 'आजचा भारतीय युवा कसा जागरूक असायला हवा तसेच युवकांना आपली कला आणि छंद जोपासले पाहिजे 


           तसेच राजमाता जिजाऊ यांच्या संदर्भात माहिती देतांना जिजाबाई त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. त्या अत्यंत कुशलतेने तलवार चालवू शकत होत्या. 


     भारत सरकारने ७ जुलै १९९९ रोजी जिजाबाईंच्या सन्मानार्थ डाक तिकीट प्रकाशित केले. जिजाबाई या अनेक चित्रपट आणि पुस्तकांच्या प्रेरणा आहेत. या वर मार्गदर्शन केल. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पंकज कावरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ज्यात विद्यार्थ्यांनी स्वामीजींचे विचार कशा प्रकारे यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला डॉ. पल्लवी जुनघरे, डॉ. विनय कवाडे, प्रा. शुभांगी भेंडे, प्रा.राजेंद्र साखरे, डॉ. बालमुकुंद कायरकर, प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. विभावरी नखाते, प्रा. श्रद्धा कवाडे श्री. कृष्णा लाभे यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी व एनसीसीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)