Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

मनोहर सप्रे जयंती निमित्त विनम्र अभिवादन : चंद्रपूरच्या वैचारिक क्रांतीचा 'सप्रे' स्तंभ ! (Humble tribute on the occasion of Manohar Sapre's birth anniversary: ​​Sapre, the pillar of Chandrapur's intellectual revolution !)

मनोहर सप्रे जयंती निमित्त विनम्र अभिवादन : चंद्रपूरच्या वैचारिक क्रांतीचा 'सप्रे' स्तंभ ! (Humble tribute on the occasion of Manohar Sapre's birth anniversary: ​​Sapre, the pillar of Chandrapur's intellectual revolution !)

चंद्रपूर :- आज ४ जानेवारी... चंद्रपूरचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व, चंद्रपूर भूषण, ख्यातनाम व्यंगचित्रकार, काष्ठशिल्पकार, साहित्यिक आणि प्रखर विचारवंत स्व. मनोहर सप्रे यांची पहिली जयंती. मागील वर्षी याच महीन्यात (१३ जानेवारी २०२५) त्यांनी जगाचा निरोप घेतला होता. सप्रे सर आज आपल्यात नसले, तरी त्यांनी दिलेला विचारांचा वारसा आजही चंद्रपूरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात तेवत आहे. 'देह' दान केला, पण 'विचार' अजरामर केले! सप्रे सरांनी आयुष्यभर समाजाला केवळ प्रबोधनच केले नाही, तर मृत्यूनंतरही त्यांचा संकल्प सिद्धीस नेला. स्वतःच्या देहाचा उपयोग वैद्यकीय शिक्षणासाठी व्हावा, या महान उद्देशातून त्यांनी आपले शरीर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दान केले. त्यांच्या या 'महादाना'तून आपण सर्वांनी सामाजिक बांधिलकीची मोठी शिकवण घेतली पाहिजे. इको-प्रो आणि सप्रे सर : एक अतुट नाते इको -प्रो च्या पर्यावरण संवर्धन आणि चंद्रपूरच्या हक्काच्या लढाईत सप्रे सर नेहमीच अग्रभागी राहिले. 'इको-प्रो' चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून त्यांनी प्रत्येक आंदोलनाला आणि अभियानाला वैचारिक धार दिली. निसर्गाप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि बंडू धोतरे यांच्या नेतृत्वातील उपक्रमांना लाभलेला त्यांचा आधार मोलाचा ठरला. अभिवादन सोहळा आज इको-प्रो संस्थेच्या वतीने सरांना त्यांच्या जयंतीनिमित्त 'स्व. मनोहर सप्रे अभ्यासिका' येथे विनम्र अभिवादन करण्यात आले. या अभ्यासिकेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांच्या रुपाने सप्रे सरांचा ज्ञानयज्ञ आजही सुरू आहे. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे, ज्येष्ठ सदस्य सुभाषभाऊ शिंदे, भारती शिंदे, कुणाल देवगीरकर, राजू काहिलकर, सचिन धोतरे, अमित कुंभरे, नितेश येगेवार, रोहित आणि चित्राक्ष धोतरे यांनी उपस्थित राहून सरांच्या स्मृतींना उजाळा दिला. सप्रे सरांनी आयुष्यभर चंद्रपूरच्या अस्मितेसाठी आणि पर्यावरणासाठी काम केले. त्यांचे व्यंगचित्र असो वा काष्ठशिल्प, त्यातून नेहमीच एक सामाजिक संदेश झळकत असे. चंद्रपूरच्या या महान पुत्रास, वैचारिक दीपस्तंभास जयंतीनिमित्त मानाचा मुजरा ! 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या