चंद्रपूर :- '८ व्या टॉफ्ट टायगर वाईल्डलाईफ टुरिझम अवॉर्ड्स २०२५' सोहळ्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने राष्ट्रीय स्तरावर आपली मोहोर उमटवली आहे. ताडोबातील मोहुर्ली (कोअर) गेट येथे कार्यरत निसर्ग मार्गदर्शक शाहनाज सुलेमान बेग यांना 'बिली र्जन सिंग मेमोरियल अवॉर्ड फॉर ट वाईल्डलाईफ गाईड ऑफ द (पश्चिम भारत)' या अत्यंत प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित यात आले. नवी दिल्ली येथील बिकानेर हाऊसमध्ये ८ व्या' टॉफ्ट' टायगर वाईल्ड लाईफ टुरिझम पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. पश्चिम भारतातील एकूण आठ नामांकनांमधून श्रीमती शाहनाज बेग यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पहिली महिला निसर्ग मार्गदर्शक म्हणून त्या ओळखल्या जातात. मोहुर्ली कोअर गेटवरील त्यांची उत्कृष्ट सेवा ही संवर्धन-आधारित पर्यटनाच्या क्षेत्रातील महिला सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरली आहे. वन्यजीवांचा सखोल अभ्यास, मार्गदर्शनातील नैतिक मूल्ये आणि सफारी दरम्यानची व्यावसायिक वागणूक या गुणांची दखल घेत त्यांचा हा गौरव करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा 'टॉफ्ट टायगर्स' चे संस्थापक आणि अम्बेसिडर ज्युलियन मॅथ्यूज, तसेच ज्युरी सदस्य व 'टॉफ्ट टायगर्स' चे संचालक विशाल सिंग आणि 'सँक्च्युरी एशिया'चे संस्थापक बिट्टू सहगल यांच्या हस्ते पार पडला. 'टॉफ्ट टायगर्स अवॉर्ड्स' हे भारत आणि नेपाळमधील जबाबदार पर्यटन, नैतिक वन्यजीव पद्धती आणि जनसहभागासाठी एक मापदंड मानले जातात. श्रीमती शाहनाज यांची निवड ही ताडोबा प्रशासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या कौशल्य विकास, उच्च दर्जाचे मार्गदर्शन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरातील स्थानिक समुदायासाठी शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या कटिबद्धतेला अधोरेखित करते. श्रीमती शाहनाज यांच्या यशासोबतच, ताडोबा परिसरातील जबाबदार पर्यटनात योगदान देणाऱ्या इतर घटकांचाही या सोहळ्यात गौरव करण्यात आला. पगदडी रिसॉर्टचे शाहीन शेख यांना 'बेस्ट नॅच्युरलिस्ट' पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच, आदरातिथ्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल 'स्वसारा रिसॉर्ट' आणि 'वृक्ष रिसॉर्ट' यांना विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या