बल्लारपूर पोलिसांची जुगार अड्डयावर धाड, ८७ हजार रुपये मुद्देमालासह 4 व्यक्ती ताब्यात, 3 पसार (Ballarpur police raided a gambling den, seizing goods worth 87,000 rupees and taking 4 people into custody, while 3 others escaped.)
बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील श्रीराम वॉर्ड परिसरात स्मशानभूमीजवळ सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर बल्लारपूर पोलिसांनी धडक कारवाई करत चौघांना ताब्यात घेतले असून, तिघे आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल फोन व जुगार साहित्य असा एकूण ८७ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. १३ डिसेंबर रोजी पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या आदेशाने बल्लारपूर पोलीस पेट्रोलिंग करीत असताना, श्रीराम वॉर्ड, स्मशानभूमी परिसरात काही इसम ५२ पत्त्यांवर पैशांचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांना पाहताच ३ इसम पळून गेले, तर चौघांना रंगेहात पकडण्यात आले. ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये देव्यांश अभय ठाकुर (२२), रा. सुभाष वॉर्ड, सुजल किशोर भोयर (२२) , रा. श्रीराम वॉर्ड, रघुवीर अरविंद झाडे (२६), रा. श्रीराम वॉर्ड आणि सुरज संजय वासलवार (३२), रा. श्रीराम वॉर्ड बल्लारपूर याचा समावेश आहे. तर घटनास्थळावरून पळून गेलेल्या आरोपींची नावे यश जंपलवार, योगेश मोरे दोघे रा. श्रीराम वॉर्ड व मयूर करमनकर रा. सिद्धार्थ वॉर्ड बल्लारपूर अशी निष्पन्न झाली आहेत. आरोपी कडून रोख रक्कम, ५२ पत्त्यांचा संच तसेच तीन मोबाईल फोन असे एकूण ८७ हजार रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आले. सदर कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार मोहनलाल निषाद, संदेश वाघमारे, प्रविण निकोडे, पोअं फुलचंद लोधी यांनी केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या