मूत्रपिंड प्रकरणाचा तपास आता स्थानिक गुन्हे शाखेकडे (The kidney racket case has now been handed over to the local crime branch.)
चंद्रपूर :- मूत्रपिंड काढल्यानंतर चीनशी संबंधित कंबोडियन डॉक्टर चिआंग हा अवघ्या काही तासात केवळ चीन येथून आलेल्या रुग्णांना मूत्रपिंड लावत होता. भारतातील अनेकांचे मूत्रपिंड प्रत्यारोपित करण्यात आल्याची माहिती आरोपींनी दिली आहे. या अतिशय गंभीर प्रकरणाचा तपास ब्रम्हपुरी पोलिसांकडून काढून स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला असल्याची माहिती असून यासाठी विशेष पोलीस पथक (एसआयटी) अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या नेतृत्वात कार्यरत राहणार आहे. या दरम्यान, रामकृष्णन सुंचू व हिमांशू भारद्वाज यांनी त्यांच्यासोबत कंबोडिया येथे गेलेल्या आणखी काही युवकांची नावे सांगितल्याची माहिती आहे. मूत्रपिंड विक्री प्रकरणात कंबोडिया येथे कार्यरत आणि चीन येथून आलेला डॉ. चिआंग मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, कंबोडिया येथे मूत्रपिंड काढल्यानंतर अवघ्या काही तासांच्या आत चिनी रुग्णांना मूत्रपिंड लावण्यात येत होते अशीही माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांना रोशन कुडे याच्यासोबत गेलेल्या सर्व युवकांची नावे मिळाली आहे. तसेच कुडे याच्या पूर्वी व नंतर गेलेल्या काही तरुणांचीही नावे मिळाली आहेत. मूत्रपिंड प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत असल्याने पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी हे प्रकरण ब्रम्हपुरी पोलिसांकडून काढून स्थानिक गुन्हे शाखेकडे सुपूर्द केले आहे. तसेच या प्रकरणात गठीत केलेली एसआयटी अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या नेतृत्वात कार्यरत राहणार आहे. या प्रकरणात पोलिसांकडे आणखी काही नावे समोर आली आहे. तसेच रामकृष्णन सुंचू व हिमांशु यांनी पोलिसांना जी नावे सांगितली आहेत त्यांची माहिती गोळा केली जात आहे. सोमवार २९ डिसेंबरला रामकृष्णन व हिमांशू या दोघांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या