Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसीला 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ (The deadline for e-KYC under the Chief Minister's 'My ladki bahin' scheme has been extended until January 31.)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील  ई-केवायसीला 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ (The deadline for e-KYC under the Chief Minister's 'My ladki bahin' scheme has been extended until January 31.)

वृत्तसेवा :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील दीड कोटी महिलांना ई-केवायसी करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र अजूनही सुमारे ४५ लाख महिलांनी ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे या प्रक्रियेसाठी आणखी एक महिन्याची म्हणजे ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळणार आहे. दुसरीकडे पती-वडील दोन्हीही नसलेल्या लाभार्थींची माहिती स्वतंत्रपणे संकलित केली जाणार असून त्यासाठी संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. 
           लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुरवातीला एक कोटी ५६ लाख महिला होत्या, पण निकषांच्या आधारे पडताळणी केल्यानंतर आता एक कोटी दहा लाखांपर्यंतच लाभार्थी राहिले आहेत. तरीपण, आता योजनेच्या निकषांनुसारच ज्या महिला लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांची पडताळणी केली जात आहे. त्यासाठी 'ई-केवायसी'च्या माध्यमातून लाभार्थी व त्यांच्या कुटुंबप्रमुखाचे आधारलिंक केले जात आहे. पुढे अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या लाभार्थींचा लाभ कायमचा बंद केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर ई-केवायसीसाठी आता दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली जाणार आहे. त्या मुदतीत लाडक्या बहिणींना ई-केवायसी करावीच लागणार आहे. १ एप्रिलनंतर ई-केवायसी न केलेल्यांचा लाभ बंद होऊ शकतो, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सुमारे ३५ टक्के लाभार्थी ई-केवायसी करायचे राहिले आहेत. ई-केवायसीसाठी आता दोन दिवसच मुदत राहिली असून लाभार्थींना त्यासाठी मुदतवाढ मिळेल. दुसरीकडे लाभार्थी महिलांना नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याचा लाभ एकत्रितपणे वितरीत होऊ शकतो. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या