मुंबईसह अकोला महापालिकेत काँग्रेस-वंचित तर चंद्रपुरात नव्या राजकीय समीकरणांची चाहूल; वंचित–शिवसेना (उबाठा) यांच्यात समसमान जागावाटपावर चर्चा (In addition to Mumbai, new political equations are emerging in Akola Municipal Corporation with Congress and Vanchit Bahujan Aghadi, and in Chandrapur; discussions are underway between Vanchit Bahujan Aghadi and Shiv Sena (UBT) for an equal seat-sharing arrangement.)

Vidyanshnewslive
By -
0
मुंबईसह अकोला महापालिकेत काँग्रेस-वंचित तर चंद्रपुरात नव्या राजकीय समीकरणांची चाहूल; वंचित–शिवसेना (उबाठा) यांच्यात समसमान जागावाटपावर चर्चा (In addition to Mumbai, new political equations are emerging in Akola Municipal Corporation with Congress and Vanchit Bahujan Aghadi, and in Chandrapur; discussions are underway between Vanchit Bahujan Aghadi and Shiv Sena (UBT) for an equal seat-sharing arrangement.)

चंद्रपूर :- राज्यातील 29 महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवनवीन युती आघाडी स्थापन होतांना दिसत आहे विशेषता मुंबई महापालिकेत शिवसेना(उबाठा)-मनसे, भाजप-शिवसेना(शिंदे), यांच्यात पूर्वीच युतीची घोषणा झाली आहे त्यात आज दुपारी मुंबईत हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस व धैर्यवर्धन फुंडकर उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांनी एका पत्रपरिषदेत काँग्रेस-वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाल्याची घोषणा केली असून मुंबईत 157 जागावर काँग्रेस तर 62 जागावर वंचित आघाडी आपले उमेदवार लढविणार आहे त्याच प्रमाणे अकोला महापालिकेतही काँगेस व वंचित आघाडी युती अंतिम टप्प्यात असल्याची सूत्रांची माहिती आहे. 
         आगामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून संभाव्य आघाड्यांबाबत चर्चा सुरू झाली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या चंद्रपूर महानगर कार्यालयात वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी महानगरपालिका निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे लढवण्याच्या शक्यतेवर विचारविनिमय झाला. विशेषतः जागावाटपाबाबत ‘५०-५० टक्के’ समसमान वाटपाच्या धोरणावर प्राथमिक चर्चा करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे महानगर अध्यक्ष स्नेहल रामटेके यांनी शिवसेना (उबाठा)चे जिल्हाप्रमुख संदीप गिरे यांना चर्चेसाठी निमंत्रित केले होते. दोन्ही पक्षांमध्ये समन्वय साधून निवडणुकीला सामोरे जाणे आणि स्थानिक पातळीवर संयुक्त रणनीती आखणे, या मुद्द्यांवर बैठकीत खलबते झाली. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे स्नेहल रामटेके (महानगर अध्यक्ष), तनुजा (महानगर महिला आघाडी), रूपचंद निमगडे (जिल्हा उपाध्यक्ष, पश्चिम), सुभाषचंद्र ढोलणे (सहसचिव) यांच्यासह शिवसेना (उबाठा)चे संदीप गिरे (जिल्हा प्रमुख), सुरेश पचारे (शहर महानगर प्रमुख), सतीश भिवगडे (माजी जिल्हा प्रमुख) आदी पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात संभाव्य आघाडी आणि समसमान जागावाटपाच्या चर्चेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेना (उबाठा)-वंचित हे दोन्ही पक्ष प्रत्येकी 33 जागांवर आपले उमेदवार लढविणार असल्याची माहिती आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)