चंद्रपूरसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा, महापालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू, 15 जानेवारीला निवडणूक तर 16 जानेवारीला मतमोजणी (Elections have been announced for 29 municipal corporations in the state, including Chandrapur. The code of conduct has been implemented in the municipal areas. The election will be held on January 15th, and the counting of votes will take place on January 16th.)

Vidyanshnewslive
By -
0

मुंबई :- राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने आज दुपारी 4:00 वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेला दिनेश वाघमारे राज्य निवडणूक आयुक्त, सुरेश काकाणी सचिव निवडनुक आयोग यांच्यासह अन्य सन्माननीय व्यक्तीची उपस्थिती होती यावेळी निवडणुकीची घोषणा करतांना 29 महापालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली असून या महापालिका निवडणुकीत 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025 पर्यत नामनिर्देशन पत्र दाखल करता येईल तसेच नामनिर्देशन पत्र यावेळी ऑफलाईन स्वरूपात दाखल करता येईल. 31 डिसेंबर 2025 छाननी होईल 2 जानेवारी 2026 पर्यत नामनिर्देशन परत घेता येईल 3 जानेवारीला 2026 उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येईल तर 15 जानेवारी 2026 ला निवडणूक होईल तर 16 जानेवारीला या सर्व महापालिकाची मतमोजणी होईल या निवडणुकीत 29 महापालिका क्षेत्रात 3 कोटी 48 लक्ष मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यात येणार आहे तसेच ब्रहन्मुंबई सह राज्यातील 28 महापालिकांच्या निवडणूक कार्यक्रम एकच राहणार असून मुंबई साठी 1 प्रभाग तर ईतर महापालिकात बहूसदस्य प्रभाग रचना असणार आहेत विशेष म्हणजे या 29 महापालिका क्षेत्रात एकूण जागा - २,८६९, जागांसाठी महिला - १, ४४२, अनुसूचित जाती - ३४१, अनूसूचित जमाती - ७७, नागरिकांचा मागास प्रवर्ग - ७५९ त्यामुळं ईतर महापालिकात मतदारांना 3 ते 5 उमेदवारांना मतदान करावे लागेल. तसेच चंद्रपूर व नागपूर महापालिका जिथे आरक्षण 50% वर गेले आहे तेथील निवडणूक निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहणार असल्याचे राज्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)