बल्लारपूर :- 21 महाराष्ट्र बटालियन NCC च्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूर शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय येथे भारत सरकार द्वारे नई रोशनी या स्किम अंतर्गत नारी शक्ती यावर कार्यक्रम राबविण्यात येत आहे. महाविद्यालयातील NCC विभाग द्वारा नारी शक्ती विषयावर महाविद्यालयाच्य NCC कैडेट्सन विद्यार्थीना मार्गदर्शन करण्यात आले. तत्पूर्वी या कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रा. श्रद्धा कवाडे तर मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा. शुभांगी भेंडे यांची तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पल्लवी जुनघरे, डॉ. सतिश कर्नासे, डॉ. स्वप्नील बोबडे, डॉ. पंकज कावरे, प्रा.विभावरी नखाते यांची विचारपिठावर उपस्थिती होती. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा. शुभांगी भेंडे यांनी महिला सशक्तीकरणं व सक्षमीकरण यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर प्रा. नखाते मॅडम यांनी नारी शक्ती या योजनेबद्दल मार्गदर्शन केले डॉ. स्वप्नील बोबडे यांनी नारी शक्ती वर कविता सादर केली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मार्गदर्शन ले. प्रा. योगेश टेकाडे यांनी केले या कार्यक्रमाचं संचालन अफ्रिन शेख यांनी तर आभार प्रदर्शन प्राची चांदेकर यांनी केले यावेळी विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची लक्षनीय उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या