Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

आरक्षणाची किंमत.. ज्यांना सगळे आयते मिळाले त्यांना काय कळणार ? (The price of reservation.. What will those who got all the verses know ?)

आरक्षणाची किंमत.. ज्यांना सगळे आयते मिळाले त्यांना काय कळणार ? (The price of reservation.. What will those who got all the verses know ?)

वृत्तसेवा :- समाजातील सर्व वंचित घटकांना आणि सर्व मागासवर्गीयांना आरक्षणाचा हक्क मिळावा म्हणून सर्व परिस्थिती प्रतिकूल असताना बाबासाहेबांनी एकट्याने 1920 पासून ते 1951 पर्यंत संघर्ष केला. यासाठी पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या गोलमेज परिषदेत बाबासाहेबांनी हे हक्क मिळवून घेतले. त्यातून कलम 15, 16 , कलम 340 (ओबीसीसाठी, संसदेत चर्चा 16 जून 1949 या चर्चेत बाबासाहेबांनी आक्षेपांना उत्तरे दिली आणि कलम मंजूर झाले )
             341 ( अनुसूचित जातीसाठी ) 342 ( अनुसूचित जमातीसाठी ) या सर्व तरतुदी संविधान सभेत मंजूर केल्या नंतर अनुसूचित जाती, जमातीसाठी तरतुदी झाल्या खऱ्या पण इतर मागासवर्गीयांसाठी आयोग नेमण्याची तरतूद असतानाही सरकारने आयोग नेमला नाही म्हणून बाबासाहेब कमालीचे नाराज झाले दुसरे कारण होते हिंदू कोड बिलाचे ! आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले होते. सध्याचा हिंदू धर्म एखाद्या निबीड जंगलासारखा आहे मला त्याचे नंदनवनात रूपांतर करण्याची इच्छा आहे पण उजव्या विचारसरणीच्या कट्टर पंथीय ब्राह्मणांनी विरोध केल्यामुळे नेहरू, राजेंद्र प्रसाद, सरदार पटेल यांची हे बील मंजूर करण्याची हिंमत झाली नाही. म्हणून बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल आणि ओबीसींसाठी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. पुढे सरकारने हिंदू कोड बिल क्रमशः, तुकड्या तुकड्यात पास केले. आज सर्व महिलांना जो मान सन्मान आहे, पुरुषांच्या बरोबरीने ती बाबासाहेबांची पुण्याई आहे मग ते समान वेतन असो की, बाळंतपणाची रजा याशिवाय त्यांचे जे दुसरे कारण होते. त्यात आधी कालेलकर आयोग आणि नंतर मंडल आयोग आला. पुढे १९९० मध्ये तत्कालीन पंतप्रधान व्हि. पी. सिंग यांच्या काळात ओबीसींचना जे आरक्षण मिळाले ती पण त्यांचीच पुण्याई
            आज हाच धागा धरून मराठा समाज आरक्षणासाठी संघर्ष करतो आहे.‌ त्याची प्रचिती जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने तुम्ही पाहात आहात अर्थात ज्यांना हा संघर्ष न करता आयते आरक्षण मिळाले आहे त्यांना याची किंमत कळायला हवी आणि आपण आज जे सुखाचे चार घास खात आहोत ( जात चोरुन राहात आहोत) ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या संघर्षामुळे हे कधीतरी समजायला हवे. त्याहीपेक्षा आरक्षण काय आज आहे उद्या कदाचित नसेल पण बाबासाहेबांनी माणूस म्हणून जो हक्क सर्व ८५ टक्के बहुजन समाजाला दिला तो तुम्हाला जो देव, धर्म आपला वाटतो ना त्यांनी नाही दिला. हे ज्या दिवशी तुम्हाला कळेल त्या दिवशी बाबासाहेबांचे महत्व पटेल आरक्षण मिळविण्यासाठी काय त्याग, संघर्ष आणि बलिदान करावे लागते ते मराठा आंदोलकांच्या आंदोलनाकडे पाहून जाणून घ्या. म्हणून भावांनो आणि बहिणींनो बाबासाहेब आणि आंबेडकरी विचार, चळवळ समजून घ्या आणि फक्त आंबेडकरवादी व्हा. त्यातच ८५ टक्के बहुजन समाजाचे कल्याण आहे. जे युगानुयुगे तुमचे नव्हते त्यांच्या गुलामीच्या जाळ्यातून बाहेर पडा. आज तुम्हाला त्यांच्याकडून जो मानसन्मान मिळतो आहे ना तो केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे !

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या