Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

बल्लारपूरात अवैध लोखंडी तलवारसह एकास अटक, बल्लारपूर पोलिसांची कारवाई (One arrested with illegal iron sword in Ballarpur, Ballarpur police take action)

बल्लारपूरात अवैध लोखंडी तलवारसह एकास अटक, बल्लारपूर पोलिसांची कारवाई (One arrested with illegal iron sword in Ballarpur, Ballarpur police take action)

बल्लारपूर :- पोलीस ठाणे बल्लारपूर यांची उल्लेखनिय कामगीरी अशी आहे की, दिनांक - ०९/०९/२०२५ रोजी सपोनि मदन दिवटे पोलीस ठाणे बल्लारपुर सोबत पो.कर्म सहाफौज. रणविजय ठाकूर, पोहवा. संतोष पंडीत, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, पुरूषोत्तम चिकाटे, पो. अंमलदार शरदचंद्र कारूप, लखन चव्हान, विकास जुमनाके सचिन अलेवार, म.पो. अंमलदार शालीनी नैताम सह पोस्टे. हद्दीत गणपती विसर्जण निमीत्ताने पेट्रोलींग करतांना मुखवीरव्दारे खात्रीशीर खबर मिळाली की, संघमित्रा चौक, विद्यानगर वार्ड बल्लारपुर येथे राहणारा समिर कुरेशी हा लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने आपले घरी विनापरवाना लोखंडी तलवार बाळगून आहे. अशी खात्रीशीर खबर मिळाल्यावरून आरोपी समीर सगीर कुरेशी वय ४२ वर्ष धंदा - मजूरी रा. संघमित्रा चौक, विद्यानगर वार्ड बल्लारपुर याचे घराची दोन पंचासमक्ष झडती घेतली असता घराचे सज्जावर लपवून ठेवलेली लोखंडी तलवार मिळून आल्याने त्याचेवर कलम ४, २५ आर्म अक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर ची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन सा. मा. अपर पो. अधिक्षक ईश्वर कातकडे, श्री. सुधाकर यादव सा. उपविभागिय पो अधिकारी, राजूरा/चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात पो. निरिक्षक बिपीन इंगळे, सपोनि मदन दिवटे, सफौ. रणविजय ठाकुर, पोहवा. सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, संतोष पंडीत, पुरूषोत्तम चिकाटे पो. अंमलदार लखन चव्हान, विकास जुमनाके, शरदचंद्र कारूष, सचिन अलेवार, म.पो. अंमलदार शालीनी नैताम इत्यादी पो. स्टाफ यांनी अतिशय कुशलतेने केली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या