बल्लारपूरातील गोल पुलिया रस्त्याच्या दुरुस्ती साठी 21 सप्टेंबर पर्यंत जड वाहूतुकीसाठी बंद राहणार (Ballarpur's Gol Pulia road will be closed for heavy traffic till September 21 for repairs)


बल्लारपूर :- बल्लारपुर शहरातील सर्व नागरीकांना सुचित करण्यात येते की, बल्लारपुर शहरात मोठ्या प्रमाणात नवरात्री उत्सव साजरा करण्यात येत असल्यामुळे गोल पुलियात रस्ता दुरुस्तीकरीता दिनांक 15 ते 21 सप्टेंबर 2025 पर्यंत गोल पुलिया रोडचे बांधकाम करावयाचे आहे. जड वाहन (दोन चाकी व चार चाकी तसेच एम्बुलंस) सोडुन बाकी इतर सर्व प्रकारच्या जड वाहनास वाहतूक बंद करण्यात येत आहे. याबाबत नागरीकांनी नोंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे. अशी माहिती मुख्याधिकारी नगर परिषद, बल्लारपूर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068