Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

लोककवी वामनदादा कर्डक यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त गोंडवाना विद्यापीठामध्ये अभिवादन (Tributes paid to folk poet Vamandada Kardak on his 103rd birth anniversary at Gondwana University)

लोककवी वामनदादा कर्डक यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त गोंडवाना विद्यापीठामध्ये अभिवादन (Tributes paid to folk poet Vamandada Kardak on his 103rd birth anniversary at Gondwana University)


गडचिरोली :- लोककवी वामनदादा कर्डक यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी लोककवी वामनदादा कर्डक यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व पुष्प अर्पण करून अभिवादन केले याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, कर्नल विक्रम मेहता, प्राचार्य डॉ. श्याम खंडारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रविण पोटदुखे, वित्त व लेखाधिकारी सी ए भास्कर पठारे, न. न. व. सा. चे संचालक डॉ. मनीष उत्तरवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता विद्यापीठामध्ये डॉ. विजय राठोड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती लोककवी वामनदादा कर्डक अध्ययनाचे समन्वयक रोहित बापू कांबळे यांनी दिली. याप्रसंगी प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोककवी वामनदादा कर्डक अध्ययनाच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या