Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

बल्लारपूर शहरात स्वातंत्र्य दिन देशभक्तिमय स्वरूपाने उत्साहात साजरा (Independence Day celebrated with patriotic fervor in Ballarpur city)

बल्लारपूर शहरात स्वातंत्र्य दिन देशभक्तिमय स्वरूपाने उत्साहात साजरा (Independence Day celebrated with patriotic fervor in Ballarpur city)

बल्लारपूर :- बल्लारपूर शहरात स्वातंत्र्यांचा 79 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालय परिसरात पार पडला. सकाळी 9:15 वाजता मा. रेणुका कोकाटे, तहसीलदार बल्लारपूर यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. यावेळी विविध राजकीय पक्षाचे नेते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, शहरातील गणमान्य नागरिक, पत्रकार बांधव उपस्थित होते.


                देशभक्तीच्या वातावरणात आणि ऐतिहासिक किल्ल्याच्या वैभवशाली साक्षीने, नगर परिषद तसेच किल्ला प्रांगण येथे स्वातंत्र्यदिनाचा भव्य सोहळा साजरा करण्यात आला. नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्या हस्ते तिरंग्याचे ध्वजारोहण होताच उपस्थितांनी भारत माता की जय आणि वंदे मातरम च्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. या सोहळ्यास शहरातील मान्यवर नेते, माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष, माजी नगरसेवक, पत्रकार, शिक्षक तसेच गांधी विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी संगीता उमरे, कार्यालयीन अधीक्षक नंदकिशोर सातपुते, साठा विभाग अधिकारी उपेंद्र धामणगे, लेखापाल बांगर, कर निरीक्षक गजानन आत्राम, नगर अभियंता डॉली मदन, बांधकाम अभियंता मयूर दहीकर, कृष्णा गुल्हाने, पाणी पुरवठा उप अभियंता प्रशांत गणवीर, आरोग्य निरीक्षक भूषण साळवटकर, शहर समन्वयक मयुरी भोयर तसेच सर्व लिपिक व कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रगीताच्या गजरात आणि तिरंग्याच्या वाऱ्यात फडकण्याच्या देखाव्यात, स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाची आठवण करून देत सर्वांनी देशसेवेची शपथ घेतली. ऐतिहासिक किल्ल्याच्या अंगणात उजळलेले हे देशभक्तीचे चित्र सर्वांच्या मनात अभिमानाची नोंद करून गेले. विशेष बाब म्हणजे ग्रामीण रुग्णालय, पोलीस स्टेशन बल्लारपूर, भूमी अभिलेख कार्यालय, टपाल कार्यालय, विविध बॅंक, अनेक शासकीय-निम शासकीय कार्यालय ठिकाणी ध्वजारोहन पार पडले तसेच बल्लारपूर शहरातील विविध शाळा महाविद्यालयात ध्वजारोहन पार पडले.


          स्वातंत्र्याचा महान उत्सव असलेल्या स्वातंत्र्यदिना निमित्त १५/०८/२०२५ रोजी सकाळी १०.१५ वाजता शहर काँग्रेस समितीचे अध्यक्ष देवेंद्र आर्य यांनी ऐतिहासिक गांधी चौकात ध्वजारोहण केले. याप्रसंगी प्रदेश काँग्रेस सचिव घनश्याम मूलचंदानी आणि निवृत्त अध्यक्ष अब्दुल करीम शेख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. माजी अध्यक्ष पनमल खटोड, एम. वेंकटेश बाळ बैरैया, माजी महापौर डॉ. मधुकर बावणे, दिलीप माकोडे, सुनंदा आत्राम, छाया मडावी, माजी नं. ध्वजारोहण कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती. उपाध्यक्ष डॉ.सुनील कुलडीवार, मो.शरीफ सर, सुरेश गलानी गुलाबराव मुरकुटे, भास्कर माकोडे, नरेश मुंधरा इस्माईल ढकवाला, डेव्हिड कंपेली, दिपक धोपटे, जयकरणसिंग बजगोटी, महिला काँग्रेस अध्यक्षा अफसाना सय्यद, मेघा भाले, सेवादल संघटक राहुल अमरावती, प्रणेश अमरावती, युवराज चव्हाण, महिला काँग्रेस अध्यक्ष डॉ. गांधी युवा अध्यक्ष सतीश थोटा, आयएमएचे अध्यक्ष डॉ.जयप्रकाश तुंबडे, सीडीसीसी बँकेचे संचालक डॉ.अनिल वधई, इब्राहिम जवेरी, सादिक जवेरी, राजू मुंधरा, दीपक कडेल, कासिम शेख नाना बुंदेल, बाबूभाई, सुरेश बोप्पनवार, महमूद पठाण पवन मेश्राम, हरिशराव पवार, हरीशराव पवार, रामराव पवार आदी उपस्थित होते. धानोरकर, करण कामटे, फारुख खान, राजू मरमवार, गणेश कोकाटे, विनोद आत्राम, प्रीतम पाटील, नईम भाई अजय दुपारे, अनिल मर्चेट्टीवार, सादिक अयुब, शेख नावेद खान, रवी वेला इत्यादी काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयू आय, सेवा दल, आयएनटीयूसीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
अनिल खरतड आणि नरेश मुंदडा यांनी याचे संचालन केल. भारतीय जनता पार्टी बल्लारपूर च्या वतीने व्यकटेश अपार्टमेंट येथील पक्षाच्या कार्यालयात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला यावेळी ज्येष्ठ नेते चंदनसिहं चंदेल, माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, निलेश खरबडे, मनिष पांडे, समीर केणे, राजू दासरवार, देवेंद्र वाटकर, श्रीनिवास कुंदकुरी यांच्या सह अन्य नेते उपस्थित होते.


             बल्लारपूर येथे आम आदमी पक्षाकडून ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा १५ ऑगस्ट, २०२५ - ज्या शांतीनगर परिसराकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते, त्या ठिकाणी आम आदमी पक्षाने यंदाही ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. सकाळी ठीक ९.०० वाजता ध्वजारोहण करण्यात आले. ​यावेळी आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष रवि पुप्पलवार म्हणाले, "बल्लारपूर शहरात ३२ वार्ड आणि अनेक चौक असतानाही आम्ही गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने शांतीनगर परिसरात स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. यामागचा मुख्य उद्देश म्हणजे, आपल्या शहरात असलेला हा 'शांतीनगरच्या' नावाला असलेला डाग पुसून काढणे. येथील लोकांमध्ये सकारात्मकता आणि संवेदनशीलता निर्माण करून त्यांना शहराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही हे कार्यक्रम इथे आयोजित करतो." ​कार्यक्रमाचे आयोजन पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने केले. यात लहान मुलांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले. कार्यकर्त्यांनीही गाणी गायली आणि मंचावर उपस्थिति अतिथी व "AAP" नेत्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला आम आदमी पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. हा कार्यक्रम बालाजी वार्ड, शांतीनगर परिसर, ग्रामीण रुग्णालय मागे, बल्लारपूर येथे आयोजित करण्यात आला होता.


संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
           

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या