Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

जगातला आतापर्यंतचा सर्वात महागडा ('महादानशूर' अनाथपिंडकाचे धम्मदान.) The most expensive donation in the world so far ('Mahadanshura' Anathpindaka's Dhamma donation.)

जगातला आतापर्यंतचा सर्वात महागडा ('महादानशूर' अनाथपिंडकाचे धम्मदान.) The most expensive donation in the world so far ('Mahadanshura' Anathpindaka's Dhamma donation.)

वृत्तसेवा :- जगातला आतापर्यंतचा सर्वात महागडा (सात पद्म,आठ निखर्व रुपये, किंवा ७,८०० हजार कोटी रुपये, किंवा ७८० अब्ज रुपये, रक्कम इतकी महाप्रचंड होती ....! ) व्यवहार - तो देखील दानासाठी होता तथागत बुध्द आणि त्यांच्या संघासाठी जगातली सर्वात महागडी जागा खरेदी केली गेली , ही एक ऐतिहासिक सत्य घटना आहे .. 'श्रावस्ती' नगरातील व्यापारी 'सुदत्त' हा राजगृह येथे आपल्या जावया कडे पाहुणा म्हणून आला होता. त्याने आपल्या जावया कडील उडालेली धांदल बघितली . याचे कारण विचारले असता, भोजनासाठी तथागत बुध्द हे आपल्या भिक्खू संघासह येणार होते. भोजनानंतर तथागतांनी दिलेले प्रवचन ऐकून सुदत्त फारच प्रभावित झाला. तथागत श्रावस्तीला वर्षावासा साठी आलेच पाहिजेत ही त्यांच्या मनातली तीव्र इच्छा त्याने बोलून दाखवली. तथागतांच्या वर्षावासा साठी वस्तीपासून दूर नको आणि जास्त जवळही नको अशी निसर्गरम्य जागा असली पाहीजे , हे त्याला कळले. अशी जागा श्रावस्तीमध्ये राजकुमार 'जेत' याची होती . तो जेत कुमार जमीन विकायलाच तयार नव्हता . त्याचेशी खरेदी - विक्रीची चर्चा सुरू असतांना जेत कुमाराला सुदत्ताने शब्दात पकडले .. जेत कुमार निग्रहाने अतिशयोक्तीने बोलला की .. " जर ह्या जमिनीवर सोन्याची नाणी पसरून ठेवशील तरच तुला मी ही जमीन देईल ... तो शब्द प्रमाण मानून सुदत्ताने तात्काळ शेकडो बैलगाड्या मध्ये, गोण्या भरभरुन सोन्याची नाणी आणली ,आणि त्या जमिनीवर ती नाणी पसरुन तब्बल साडे चौदा एकर जमीन खरेदी केली. ही जगातली सर्वात महागडी खरेदी आहे . ह्या खरेदीचा तो प्रसंग भरहूत येथील स्तुपावर शिल्परुपाने कोरण्यात आलेला आहे .. या शिल्पात बैलगाड्या भरुन नाणी आणून जमिनीवर पसरण्याचे काम करणारे मजूर व सुदत्त दिसत आहे. एक नोकर पाण्याची सुरई घेऊन उभा आहे ,. व्यवहार पुर्ण झाल्यावर दोघांच्याही हातावर जल शिंपडण्यात येत असे असा तत्कालीन प्रघात होता .त्याशिवाय कोणताही व्यवहार किंवा दान सफल होत नसे.  मागे जेत कुमार व त्याचे सेवक सुदत्ता कडे आश्चर्यचकित होऊन बघत आहे .जेत कुमारने तर आपली बोटे तोंडातच घातलेली आहेत .. या शिल्पाच्या खाली तत्कालीन लिपीत एक वाक्यच कोरलेले आहे .त्या वाक्यावरुन सुस्पष्ट अर्थबोध झालाय की हा व्यवहारात किती नाणी खर्च झाली .. आणि नाणी कशा पध्दतीने जमिनीवर पसरुन नाण्यांनी ती सर्व जमीन आच्छादली गेलीय ..... सोन्याची तब्बल अठ्ठ्यात्तर कोटी नाणी त्या संपूर्ण जमीनीच्या भू-खंडावर पसरण्यात आली होती. अठ्ठ्यात्तर कोटी सुवर्ण नाणी ह्या कामी खर्च झालीत. एक एक सुवर्ण नाणे (कार्षापण ) हे एक तोळ्याचे होते .अशी काही नाणी त्याच ठिकाणी उत्खननात मिळालेली आहेत . अठ्ठ्याहत्तर कोटी नाण्याचे तत्कालीन मुल्य किती असेल , आणि आज त्याचे मूल्य किती होईल, हा प्रश्न मला पडला...
      तब्बल अठ्ठ्यात्तर कोटी कार्षापण (सुवर्णमुद्रा ) त्या भूमीवर आच्छादून ती भूमी फक्त तथागतांवरील असीम श्रद्धेपोटी अनाथपिंडकाने विकत घेऊन तथागतांना त्याने अर्पण केल्याचे उल्लेख तत्कालीन पालि ग्रंथांमध्येही आढळून येतात. प्रत्येक सुवर्णमुद्रा एक तोळ्याची जरी धरली, तरी त्या हिशेबाने अठ्ठ्यात्तर कोटी तोळे - म्हणजे सात लाख ऐंशी हजार किलो वजनाचे, म्हणजेच तब्बल सातशे ऐंशी टन सोने देऊन सुदत्त अनाथपिंडकाने ही आजचे साडेचौदा एकर क्षेत्र असलेली जमीन फक्त आणि फक्त तथागतां वरील असीम श्रद्धेपोटी राजकुमार जेत याचे कडून विकत घेतली. आजच्या बाजार मूल्याने सातशे ऐंशी टन सोन्याची किंमत किती असावी...? सोन्याचा आजचा बाजारभाव १००,०००/- रुपये प्रति तोळा जरी धरला, तर तो दर १००,०००,०००/-रु.प्रति किलो (एक कोटी रुपये प्रति किलो) या हिशेबाने ७८०,००० किलो वजन असलेल्या त्या सुवर्ण मुद्रांची किंमत (७८०,०००× १००,००० = ७,८००,०००,०००,०००) या हिशेबाने तब्बल ७,८००,०००,०००,०००/- रुपये *(सात पद्म, आठ निखर्व रुपये, किंवा ७,८०० हजार कोटी रुपये, किंवा ७८० अब्ज रुपये )* इतकी महाप्रचंड होते....! सुदत्त अनाथपिंडकाची तथागतांवरील श्रद्धा पाहून, राजकुमार जेत याचेही दातृत्व जागे झाले, आणि आपल्या जमीनीचे मूल्य म्हणून सुदत्त अनाथपिंडकाने दिलेल्या अठ्ठ्यात्तर कोटी सुवर्णमुद्रांपैकी निम्म्या, म्हणजेच एकोणचाळीस कोटी सुवर्णमुद्राच स्विकारुन, उरलेल्या एकोणचाळीस कोटी सुवर्णमुद्रा राजकुमार जेत याने अनाथपिंडकास परत केल्या व त्यांच्या बदल्यात तथागतांना राहण्यासाठी अर्पण करण्यात येणाऱ्या या जागेला आपले स्वतः चे नाव देण्यात यावे, अशी त्याने अनाथपिंडका कडे इच्छा व्यक्त केली. त्या इच्छेचा स्विकार करून अनाथपिंडकाने त्या जागेचे 'जेतवन' असे नामकरण केले. तर, तथागतां साठी त्याने जी कुटी निर्माण केली, ती चंदनाच्या सुवासाने सतत सुगंधित असल्याने, तिलाच 'गंधकुटी' असे म्हणण्यात येऊ लागले. प्रस्तुत शिल्पाच्या वर्तुळाकुटी कडेवर वरच्या बाजूस अशोककालिन 'धम्मलिपी' मध्ये 'गंधकुटि' -'असे स्पष्ट कोरलेले दिसून येते. तर शिल्पाखाली  'जेतवन अनाधपिडिको देति कोटिसथतेन केता' असे वाक्य प्राकृत भाषेत, धम्मलिपी मध्ये कोरलेले आहे. जगातला आतापर्यंतचा सर्वात महागडा व्यवहार - तो देखील दानासाठी होता, आणि 'अनाथपिंडका' इतका 'महादानशूर' देखील आजपर्यंत दुसरा कोणीही झाला नाही.....! असा बुध्दाच्या धम्माचा प्रभाव होता..... या दान प्रभावा मुळेच नंतरच्या काळात निर्माण झालेल्या लेण्यांच्या प्रवेशद्वारावर धनिक व्यापाऱ्यांचे प्रतीक कुबेर, पद्मपाल , शंखपाल- हे दानी 'यक्ख' कोरण्यात आलेले असावेत, असे माझे मत आहे. त्या महादानी अनाथपिंडकाला माझे मनोमन शतशः वंदन व हा प्रसंग उभेहुब कोरणाऱ्या त्या अनाम शिल्पींना पंचांग प्रणाम....!!!

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या