महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयामध्ये " भारतीय संविधानाची पंच्याहत्तरी"  हा कार्यक्रम संपन्न ("Seventy-five years of the Indian Constitution" program concluded at Mahatma Jyotiba Phule College)


बल्लारपूर :- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बल्लारपूर द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग,  गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली द्वारा भारतीय संविधानाची पंच्याहत्तरी हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मायक्रोसॉफ्ट कॉम्प्युटरचे संचालक तसेच अनुलोम चंद्रपूरच्या संवादिनी सुषमा दालवणकर उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉक्टर रजत मंडल उपस्थित होते. विद्यार्थी विकास कार्यक्रम अधिकारी डॉ. पंकज कावरे उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन बी.कॉम प्रथम वर्षाची इंग्लिश मीडियम ची विद्यार्थिनी गायत्री पामडी यांनी केले. त्यानंतर क्रांतीसूर्य ज्योतीराव फुले आणि भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर व विद्येची देवता माता सरस्वतीचे पूजन करून यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ.पंकज कावरे यांनी केले. त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन राज्यशास्त्र विभाग प्रमुख मोहनीश माकोडे यांनी केले. त्यानंतर प्रमुख अतिथी ऍड.सुषमा दलवणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर संविधानावर चित्रफित दाखवण्यात आली . दाखवण्यात आलेल्या चित्रफितीमध्ये संविधानाचे महत्त्व, संविधानाचे आधारभूत मार्गदर्शक तत्वे तसेच संविधानापुढील धोके यावर चित्रफिती मध्ये सविस्तर माहिती देण्यात आली. अध्यक्ष भाषणामध्ये प्रभारी प्राचार्य डॉ. रजत मंडल यांनी मार्गदर्शन केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068