गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर पोलिस ठाण्यात गणेश मंडळांची बैठक पडली पार, गणेशोत्सव शांततेत व धार्मिक सौहार्द जपण्याचं आवाहन (In the backdrop of Ganeshotsav, a meeting of Ganesh Mandals was held at Ballarpur Police Station, an appeal was made to maintain peace and religious harmony during Ganeshotsav.)
बल्लारपूर :- गणेशोत्सव जवळ येत असल्याने शहरी तसेच ग्रामीण भागातील गणेश मंडळांनी शांततेत व सुव्यवस्थेत सण साजरा करावा या उद्देशाने पोस्टे बल्लारपूर येथे २२ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता पोलिस ठाण्यात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली सुमारे ४० ते ५० गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. यामध्ये विसर्जनाची तारीख ६ सप्टेंबर निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच विसर्जन मिरवणुकीचा मार्ग निश्चित करताना वाहतुकीत अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, गणेशोत्सव शांततेत व धार्मिक सौहार्द जपून साजरा व्हावा यासाठी पोलिस प्रशासनाकडून आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन व बंदोबस्त ठेवण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. ही बैठक पार पडल्याने गणेश मंडळांमध्ये समाधानाचे वातावरण असून उत्सव काळात पोलिस प्रशासन आणि मंडळ यांचे समन्वय अधिक बळकट होणार आहे. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी देखील पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी मिरवणुकीच्या मार्गावरील झाडांची छाटणी, विद्युत तारा, तसेच वाहतूक व्यवस्थापन या संदर्भात पोलिस प्रशासनाकडून माहिती देण्यात आली. मिरवणुकीत डीजे, लेझर लाईट, ध्वनिक्षेपकाचा वापर यावर मर्यादा ठेवण्याचे तसेच रात्री उशिरापर्यंत ध्वनीप्रदूषण टाळण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक इंगळे यांनी केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या