Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज ६७ वा वर्धापन दिन - गुणवंतांना पारितोषिक वितरण (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University celebrates its 67th anniversary today - Prize distribution to meritorious students)

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज ६७ वा वर्धापन दिन - गुणवंतांना पारितोषिक वितरण (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University celebrates its 67th anniversary today - Prize distribution to meritorious students)


छत्रपती संभाजीनगर :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने वर्धापनदिना निमित्त ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ विजयअण्णा बोराडे यांना जीवन साधना पुरस्कार ६७ व्या वर्धापनदिनी प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी २०२५ च्या वार्षिक परीक्षेतील गुणवंतांना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना वर्धापनदिनी जीवनसाधना पुरस्काराने गौरविण्यात येते. मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी यदाची पुरस्कार शोध समिती स्थापन केली. या समितीने ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ, कृषीरत्न विजयअण्णा बोराडे यांची जीवनसाधना शिफारस केली. विद्यापीठाच्या ६७ व्या वर्धापनदिनी येत्या २३ ऑगस्ट रोजी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिती विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ.उज्ज्वला चक्रदेव यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी हे राहणार आहेत. तर प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.गजानन सानप व प्राचार्य डॉ.भारत खंदारे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी राहील. विद्यापीठाच्या नाटयगृहात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होईल. तर या कार्यक्रमापुर्वी सकाळी ९ वाजता मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या हस्ते मुख्य इमारतीसमोरील हिरवळीवर ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
          गुणवंतांना पारितोषिक वितरण यावेळी २०२५ च्या वार्षिक परीक्षेतील १५ गुणवंतांना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ बी एन डोळे यांनी दिली. गुणवंतांची नावे पुढीलप्रमाणे :-
१. स्व.नामदेव लक्ष्मणराव गव्हाणे पारितोषिक - प्रतिक्षा चोपणे शिवाजी (एम.एस्सी गणित),
२. डॉ.एम.एल. शहारे पारितोषिक - रोशनी बाबुराव मनमोटे (एम.एस्सी.वनस्पतीशास्त्र),
३. आशा व डॉ.रामदास बोराडे पारितोषिक - राणी रामकिशन सोनवणे (बी.ए.मानसशास्त्र),
४. भगवान नाईक थत्ते पारितोषिक -शितल नवनाथ माने (एम.ए.मराठी),
५. प्राचार्य डॉ.एम.एन.वानखडे पारितोषिक - सुजित अशोक उबाळे (एम.ए.इंग्रजी),
६. करुणा ज्ञानेश्वर चापोलीकर स्मृती पारितोषिक - करुम मोहिनी जयंत (एम.ए.इतिहास),
७. शांताबाई बोराळकर स्मृती पारितोषक - मंजूश्री दगडु राऊत (एम.ए.होमसायन्स),
८. डॉ.व्ही.के.जोशी पारितोषिक - नागराज सुभाष पालापुरे (एम.ए.समाजशास्त्र),
९. डॉ.एम.सी.पवार पारितोषिक - प्रणिता अरुण पारखे (एम.ए.लोकप्रशासन),
१०.शांताबाई शहारे पारितोषिक - रीमा वायदंडे (एम.ए.वुमन्स स्टडीज),
११. अ‍ॅड.किशनराव कुलकर्णी पारितोषिक - विजयश्री आण्णा मोकळे (विधी),
१२. जवाहरलाल दर्डा पारितोषिक - अंजली संजय चव्हाण (एम.पी.ए),
१३. गंगाधर दामोदर बापट पारितोषिक - श्यामा सुजीत नायर (एम.बी.ए),
१४. डॉ. अशोक महादेव शहारे पारितोषिक - कृष्णा गजानन मोटे (एम.पी.एड),
१५. प्राचार्य दत्ता ससे पारितोषिक - सिद्दीकी मोईन फातिमा मुनीर अहमद (बी.एड.)

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या